भोपाळ, 30 जून : शेतात 10 फूट खोल पुरलेले 5 मानवी सांगाडे (Human Skeletons) पोलिसांनी (Police) शोधून काढले. यातील चार सांगाडे महिलांचे (women) आणि एक सांगाडा अल्पवयीन मुलाचा (Male) असल्याचं सिद्ध झालं. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) देवासमध्ये (Devas) घडलेल्या या घटनेमुळे पूर्ण राज्याला धक्का बसला आहे. हे सांगाडे आता फॉरेन्सिक चाचणीसाठी (Forensic Test) पाठवण्यात आले असून पोलिसांनी या हत्याकांडाचा शोध लावला आहे.
हत्याकांडामागे प्रेम प्रकरण
देवास गावात ज्या शेतात हे मृतदेह सापडले ते शेतमालकाचे दोन नातू सुरेंद्र सिंग चौहान आणि भुरू चौहान यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सत्य बाहेर आलं. सुरेंद्र सिंगचं रुपाली नावाच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. मात्र काही दिवसांनंतर सुरेंद्र सिंग चौहानं वेगळ्याच मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. रुपाली आणि तिच्या कुटुंबीयांनी या बाबीला आक्षेप घेत सुरेंद्रला जाब विचारण्यास सुरुवात केली.
सुरेंद्रनं रुपाली आणि तिच्या कुटुंबीयांना 13 मे या दिवशी बोलणी करण्यासाठी शेतात बोलावून घेतलं. सुरेंद्रसिंग चौहान आणि दिपालीच्या कुटुंबीयांची चर्चा सुरु असताना वादावादीला सुरुवात झाली. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आणि सुरेंद्रसिंगने रागाच्या भरात रुपालीसह तिच्या चार कुटुंबीयांचा खून केला. यामध्ये रुपाली (वय 21), तिची आई ममता (वय 45), बहिण दिव्या (वय 14) बहिण पूजा (वय 15) आणि भाऊ पवन (वय 14) यांची सुरेंद्र सिंगनं हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानं शेतात 10 फूट खोल खड्डे खणून या पाचही जणांचे मृतदेह त्यात गाडून टाकले.
हे वाचा - घाईघाईत उरकला विवाह; दुसऱ्याच दिवशी नववधूचं फुटलं बिंग, नवरदेवाची पोलिसांत धाव
असा लागला सुगावा
पोलीस गेले अनेक दिवस या पाच जणांचा शोध घेत होते. त्यासाठी वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या दिशेला रवाना झाली होती. मात्र काही केल्या या पाच जणांचा शोध लागत नव्हता. त्याचवेळी पोलिसांना एक टीप मिळाली. सुरेंद्र सिंग चौहानच्या शेतावर गडी म्हणून काम करणाऱ्या हुकुम सिंग नावाच्या व्यक्तीकडं या पाचजणांबाबत काही महत्त्वाची माहिती असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी हुकूम सिंगला बोलावून त्याच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी पाच जणांचे मृतदेह चौहान यांच्या शेतात गाडले गेल्याची बाब हुकूम सिंगनं पोलिसांना सांगितली.
खोदकाम करून बाहेर काढले सांगाडे
पोलिसांनी जेसीबी मशीनच्या मदतीनं शेत खणून त्यातून पाच सांगाडे बाहेर काढले. हे सांगाडे बघून गावकऱ्यांना जबर धक्का बसला. पोलिसांनी सुरेंद्र सिंग चौहानविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Murder Mystery, Police