जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोठी बातमी! श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबवर हल्ला

मोठी बातमी! श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबवर हल्ला

मोठी बातमी! श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबवर हल्ला

मोठी बातमी समोर येत आहे. आपली प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केलेला आरोपी आफताबवर आज हल्ला करण्यात आला आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 28  नोव्हेंबर :  मोठी बातमी समोर येत आहे. आपली प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केलेला आरोपी आफताबवर आज हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हल्ल्यातून आफताब सुखरूप वाचला आहे. तसेच त्याला हल्ल्यातून वाचवणारे पोलीस देखील सुरक्षीत आहेत. रोहिनी कोर्टाबाहेर आज आफताबवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला हिंदू सेनेने केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज आफताबवर रोहिनी कोर्टाबाहेर हल्ला करण्यात आला आहे. आफताबवर हल्ला करणारे आरोपी गुडगावमधून आले होते. निगम गुर्जर असे अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे नाव आहे. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे हल्लेखोरांमध्ये 15 जणांचा समावेश होता. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या समसूचकतेमुळे या हल्ल्यातून आफताब सुरक्षित वाचला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याची रवानगी पुन्हा तिहार तुरुंगात केली आहे. हा हल्ला हिंदू सेनेने केल्याची माहिती समोर येत आहे. हेही वाचा:   श्रद्धा वालकर हत्याकांड: 3 वेळा आफताबची पॉलिग्राफ टेस्ट फेल; आता पोलिसांनी घेतला हा निर्णय 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी आफताब याने आपली प्रेयसी श्रद्धाची हत्या केली होती. तो हत्या करून थांबला नाही तर त्याने तिचे 35 तुकडे केले. तो गेले सहा महिने हे तुकडे जंगलात फेकत होता. काही दिवसांपूर्वी श्रद्धाच्या आई,वडिलांनी श्रद्धा गायब असल्याची तक्रार दाखल केली होती. तपास सुरू झाल्यानंतर श्रद्धाची हत्या झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली आहे. आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्याची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात