मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /श्रद्धा वालकर हत्याकांड: 3 वेळा आफताबची पॉलिग्राफ टेस्ट फेल; आता पोलिसांनी घेतला हा निर्णय

श्रद्धा वालकर हत्याकांड: 3 वेळा आफताबची पॉलिग्राफ टेस्ट फेल; आता पोलिसांनी घेतला हा निर्णय

shraddha walker murder case

shraddha walker murder case

सामान्यपणे नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टला कोर्टाकडून मान्यता दिली जात नाही. पण पोलिसांच्या मागणीनंतर कोर्टाने मान्यता दिली. या प्रकरणात आफताब देतोय ती उत्तरं खरी आहेत की नाही, याबद्दल शंका असल्याने या टेस्ट करण्यात येत आहेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : आफताब पूनावालाला श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकून दिले होते. जवळपास सहा महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आलं आणि आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोमवारी आफताबचे दिल्लीतील रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये (एफएसएल) आणखी एक पॉलीग्राफ टेस्ट सेशन होणार आहे. या हत्याप्रकरणाशी संबंधित काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं आफताबला या टेस्टमध्ये देण्यास सांगितले जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोमवारी पॉलीग्राफ टेस्ट पूर्ण झाल्यास ते सोमवारी किंवा मंगळवारी त्याची नार्को टेस्ट करतील, अशीही माहितीही त्यांनी दिली.

  “पॉलीग्राफ टेस्टसाठी आम्ही विकेंडला सुट्टी असूनही लॅब उघडी ठेवली. रविवारी, तपास पथकाने सांगितलं की त्यांना तिहार तुरुंगातून आफताबच्या कोठडीसाठी मंजुरी मिळाली आहे आणि सोमवारी पॉलीग्राफ टेस्टसाठी ते त्याला लॅबमध्ये आणतील. आम्ही त्याच्या नार्को चाचणीसाठीही तयार आहोत. ती पॉलीग्राफ चाचणीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घेतली जाईल,” असं एफएसएलचे सहाय्यक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितलं.

  Aaftab Poonawala : श्रद्धा हत्या प्रकरणी आफताबची तिहार जेलमध्ये विशेष कक्ष, 24 तास सुरक्षा यंत्रणा

  मंगळवारी (22 नोव्हेंबर) संध्याकाळी आफताबची पहिली टेस्ट करण्यात आली होती, पण बुधवारच्या दुसऱ्या टेस्टपूर्वी तो आजारी पडल्याने ती पुढे ढकलण्यात आली. नंतर दुसरं व तिसरं सेशन गुरुवार व शुक्रवारी पार पडलं, असं एफएसएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

  “या सेशन्समध्ये आफताबने स्पष्ट उत्तरं दिली नाहीत, त्यामुळे आम्हाला अपेक्षित उत्तरं मिळाली नाहीत. त्याला सतत खोकला आणि शिंका येत होत्या, त्यामुळे मशीनवरील रीडिंगवर परिणाम झाला होता. सेशनमधील डेटाचे विश्लेषण करण्यात आलं आणि काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीत असल्याचं लक्षात आलं,” असं एका FSL अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

  श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबला वडिलांची साथ? पोलिसांनी सांगितली Inside story

  सामान्यपणे नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टला कोर्टाकडून मान्यता दिली जात नाही. पण पोलिसांच्या मागणीनंतर कोर्टाने मान्यता दिली. या प्रकरणात आफताब देतोय ती उत्तरं खरी आहेत की नाही, याबद्दल शंका असल्याने या टेस्ट करण्यात येत आहेत. आफताबच्या विरोधाभासी विधानांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याने प्रकरणाचा तपास करणाऱ्यांसाठी चाचणीचे निकालही महत्त्वाचे आहेत.

  दरम्यान, आफताबने दिल्लीमध्ये मे महिन्यात गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा आणि तिच्या शरीराचे तुकडे करून अवयव आसपासच्या जंगलात फेकल्याचा आरोप आहे. मागच्या आठवड्यात आफताबने पोलिसांना सांगितलं की, त्याने सहा महिन्यांपूर्वी छत्तरपूरच्या फ्लॅटमध्ये श्रद्धाची हत्या केली. दोन दिवसांत तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले. नंतर ते अवयव दक्षिण दिल्ली आणि गुरुग्राममधील जंगलांमध्ये फेकून दिले होते. तब्बल सहा महिन्यांनी प्रकरणाचा उलगडा झाला आणि आता त्याचा तपास सुरू आहे.

  First published:

  Tags: Crime news, Murder