मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

श्रद्धा आफताबपासून वेगळं राहणार होती पण...; दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

श्रद्धा आफताबपासून वेगळं राहणार होती पण...; दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण

आफताबनं सांगितलेल्या ठिकाणांवर तपास केला असता पोलिसांना श्रद्धाच्या जबड्याचं हाड सापडलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर या महाराष्ट्रीय तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची भयानक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून शहरातील विविध ठिकाणी फेकले होते. त्यापैकी महत्त्वाचे अवयव आता पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबनं सांगितलेल्या ठिकाणांवर तपास केला असता पोलिसांना श्रद्धाच्या जबड्याचं हाड सापडलं आहे. गुरुग्राममधून श्रद्धाच्या मृतदेहाचे आणखी काही तुकडे सापडले आहेत. आतापर्यंत श्रद्धाच्या शरीरातील 13 हाडं सापडली आहेत. याशिवाय, बाथरूम, किचन आणि बेडरूममध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत. त्यांचा तपास अहवाल येण्यास वेळ लागेल. यादरम्यान, हत्या होण्यापूर्वी श्रद्धा आफताबपासून वेगळं राहण्याचा विचार करत होती, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आफताबपासून वेगळं होण्याचा विचार करत होती, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. आफताबकडून होणाऱ्या छळाला ती कंटाळली होती. 3 आणि 4 मे रोजी दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, श्रद्धा आपल्यापासून वेगळं होऊन दुसऱ्या कोणाशी तरी सूत जुळवेल असं वाटत असल्यामुळे आफताबनं तिला जीवे मारलं.

गुगल ब्राउझिंग हिस्ट्रीमध्ये सापडल्या संशयास्पद लिंक - 

दिल्ली पोलिसांनी गुगल-पे, पेटीएम, बंबल डेटिंग अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पत्र लिहून आफताबच्या खात्यांचे तपशील मागितले होते. काही प्लॅटफॉर्म्सनी हे तपशील दिले आहेत. आफताबच्या गुगल ब्राउझिंग हिस्ट्रीमध्ये काही संशयास्पद लिंक्स सापडल्या आहेत.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही -

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात काही शस्त्रंही जप्त केली आहेत. जंगल आणि आफताबच्या फ्लॅटमधून ही शस्त्रं सापडली आहेत. आफताबने श्रद्धाचा मृतदेह यापैकी कोणत्या शस्त्रानं कापला, हे सीएफएसएलचा तपास अहवाल आल्यानंतर उघड होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताबला फ्लॅट मिळवून देणाऱ्या बद्रीची खूनामध्ये कोणतीही संशयास्पद भूमिका आढळली नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. आफताबला गुन्हेगार सिद्ध करण्यात ही सर्वांत मोठी अडचण आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आफताबला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा, श्रद्धाचे काही अवयव फ्लॅटमध्येच होते असा, पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा - श्रद्धा वालकर हत्याकांड: 3 वेळा आफताबची पॉलिग्राफ टेस्ट फेल; आता पोलिसांनी घेतला हा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, आफताबला खूप आत्मविश्वास आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो अतिशय तडकाफडकीची उत्तरं देतो. तर, आफताब वारंवार आपला जबाब बदलत असून, तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याची पॉलीग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी साकेत न्यायालयात अर्ज केला होता. साकेत न्यायालयानं दिलेल्या परवानगीनंतर गुरुवारी (24 नोव्हेंबर) त्याची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली. 1 डिसेंबर रोजी दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये त्याची नार्को टेस्ट होणार आहे.

First published:

Tags: Crime news, Delhi Police, Murder