मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

7 तास आफताबला विचारले गेले हे प्रश्न; पॉलिग्राफ टेस्ट उलगडणार श्रद्धा हत्याकांडाची संपूर्ण कहाणी?

7 तास आफताबला विचारले गेले हे प्रश्न; पॉलिग्राफ टेस्ट उलगडणार श्रद्धा हत्याकांडाची संपूर्ण कहाणी?

या टेस्टदरम्यान सुमारे सहा ते सात तास त्याची चौकशी झाली. त्याने गुन्हा का आणि कसा केला? पुरावे कुठे लपवले? यासह त्याच्या बालपण आणि कुटुंबाविषयी प्रश्न विचारण्यात आले.

या टेस्टदरम्यान सुमारे सहा ते सात तास त्याची चौकशी झाली. त्याने गुन्हा का आणि कसा केला? पुरावे कुठे लपवले? यासह त्याच्या बालपण आणि कुटुंबाविषयी प्रश्न विचारण्यात आले.

या टेस्टदरम्यान सुमारे सहा ते सात तास त्याची चौकशी झाली. त्याने गुन्हा का आणि कसा केला? पुरावे कुठे लपवले? यासह त्याच्या बालपण आणि कुटुंबाविषयी प्रश्न विचारण्यात आले.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आफताब पूनावाला नावाच्या व्यक्तीनं आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची भयानक घटना समोर आली होती. श्रद्धाच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. आफताब वारंवार आपला जबाब बदलत असून तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याची पॉलीग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयानं दिलेल्या परवानगीनंतर गुरुवारी (24 नोव्हेंबर) त्याची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली.

या टेस्टदरम्यान सुमारे सहा ते सात तास त्याची चौकशी झाली. त्याने गुन्हा का आणि कसा केला? पुरावे कुठे लपवले? यासह त्याच्या बालपण आणि कुटुंबाविषयी प्रश्न विचारण्यात आले. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दुपारच्या सुमारास पूनावाला याला पॉलीग्राफ टेस्टच्या पहिल्या सत्रासाठी दिल्लीतील रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (एफएसएल) नेण्यात आलं होतं. रात्री आठच्या सुमारास ही टेस्ट संपली. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे स्पेशल सीपी सागरप्रीत हुड्डा, यांनी पूनावालाची चाचणी सुरू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भावासोबत झालेल्या भांडणाचा राग चिमुकल्यावर काढला; नाशिकच्या आश्रमशाळेतील हत्येचं गूढ उकललं

एका एफएसएल अधिकाऱ्यानं सांगितलं, "हत्येच्या वेळी वापरलेलं हत्यार, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे आणि तिचा फोन शोधण्यासाठी पूनावालाची टेस्ट करण्यात आली. एक जोडपं म्हणून दोघांचे संबंध, श्रद्धाला भेटण्यापूर्वी पूनावालाचं आयुष्य, त्याच बालपण, कुटुंब, नातेसंबंध, त्यानं श्रद्धाला कसं मारलं आणि पुरावे कसे लपवले इत्यादींबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आले. तो सहकार्य करत होता आणि त्यानं सर्व उत्तरं दिली. त्यानं दिलेल्या उत्तरांचं विश्लेषण आणि संकलन केलं जाईल. आम्ही या निरीक्षणांचा अहवाल तयार करून पोलिसांना देऊ."

फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ट पूर्ण होण्यासाठी काही तास लागतात. टेस्ट सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतरच टेस्ट घेतली जाते. टेस्ट दरम्यान काहीवेळ विश्रांतीही दिली जाते. जेणेकरून टेस्ट देणाऱ्या व्यक्तीला दबाव जाणवत नाही.

पोलिसांनी याआधी पूनावालाला प्री-अॅनॅलिसीस चौकशीसाठी नेलं होतं. पण, त्याला ताप असल्यामुळे कारवाईला उशीर करावा लागला. या आठवड्याच्या सुरुवातीला, पोलिसांनी पूनावालाच्या कोठडीत वाढ करण्यासाठी आणि त्याची पॉलीग्राफ व नार्को टेस्ट घेण्यासाठी दिल्ली न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पुढील आठवड्यात त्याची नार्को टेस्टही घेतली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आणखी एक 'श्रद्धा'! विवाहित मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं, बोलणं बंद करताच भयानक कांड

आदल्या दिवशी, पोलीस सूत्रांनी सांगितलं की, त्यांनी गेल्या आठवड्यात या जोडप्याच्या छत्तरपूर पहाडी येथील फ्लॅटमधून आणि मेहरौलीच्या जंगलातून चाकू, ब्लेड, करवत आणि इतर साधनांसह जवळजवळ 10 ते 12 धारदार वस्तू जप्त केल्या आहेत. इतर राज्यांमध्येही पुराव्यांचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या एका पथकानं महाराष्ट्रात येऊन मुंबईतील वसईमध्ये तपास सुरू ठेवला आहे. श्रद्धाचा फोन शोधण्यासाठी दिल्ली पोलीस भाईंदरमधील एका खाडी जवळूनही फिरले. पूनावालाने श्रद्धाचा फोन नष्ट केला आहे, असा पोलिसांना संशय आहे.

जप्त केलेल्या धारदार वस्तूंबद्दल, एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, "आम्ही रक्ताचे नमुने मिळवण्यासाठी या वस्तू तपासत आहोत. पूनावालाच्या म्हणण्यानुसार, त्यानं बाथरूममध्ये श्रद्धाच्या शरीराचे 30 ते 35 तुकडे करण्यासाठी दोन-तीन मिनी-सॉ (छोटी करवत) वापरल्या होत्या. आम्हाला अद्याप त्या मिळाल्या नाहीत. आम्ही त्यानं दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहोत."

दिल्ली पोलिसांच्या एका पथकानं महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात जाऊन तपास केला आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'श्रद्धाच्या मृत्यूनंतर आरोपी मुंबईत आला होता. त्यामुळे त्यानं तिचं सामान आणि इतर पुरावे वसई किंवा ठाण्यात फेकून दिले असावेत असा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी पूनावालाच्या वडिलांचे जबाबही नोंदवले आहेत.

श्रद्धाचं कुटुंब आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावालाच्या कुटुंबाला या जोडप्यामधील तणावाच्या स्थितीबद्दल माहिती होती. मात्र, त्याच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांना श्रद्धाच्या हत्येबद्दल काहीही माहिती नाही. ते आपल्या मुलाशी फार संपर्कात नव्हते. त्यामुळे पोलीस आता बाप-लेकाचं नातं आणि आरोपी पूनावालाच्या वर्तनाबद्दल तपशील मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईत श्रद्धाचा फोन शोधताना एका पोलीस सूत्रानं सांगितलं, "पूनावालानं दावा केला की, त्यानं दिल्लीत फोनमधील सिमकार्ड डिस्पोज केलं आणि फोन मुंबईतील भाईंदर खाडीत फेकून दिला. त्याचे पालक वसईतून मीरा रोड येथे नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी तो दिल्लीहून मुंबईला आला होता. ट्रेनमधून खाडी ओलांडत असताना त्यानं फोन पाण्यात फेकला."

First published:

Tags: Crime news, Murder