मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आफताबची नार्को टेस्ट फेल झाल्यास पोलिसांकडे B प्लॅन रेडी; पुढची चाचणी अत्याधुनिक

आफताबची नार्को टेस्ट फेल झाल्यास पोलिसांकडे B प्लॅन रेडी; पुढची चाचणी अत्याधुनिक

आफताबची नार्को टेस्ट फेल झाल्यास पोलिसांकडे B प्लॅन रेडी

आफताबची नार्को टेस्ट फेल झाल्यास पोलिसांकडे B प्लॅन रेडी

Shraddha Walkar Murder Case: आफताब पूनावाला याने दक्षिण दिल्लीतील त्यांच्या मेहरौली येथील घरात लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : दिल्ली शहरातील हृदय पिळवटून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाशी संबंधित दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बुधवारी सांगितले की, आफताब पूनावालाच्या पॉलीग्राफ आणि नार्को टेस्टचे रिझल्ट फेल आल्यास त्यांच्याकडे बी प्लॅन रेडी आहे. त्यानुसार ते आरोपींचे ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी करू शकतात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका पोलीस सूत्राने सांगितले की, त्यांची टीम आफताबचे ब्रेन मॅपिंग करून घेण्यासाठी कोर्टात जाऊ शकते. रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अधिकार्‍यांनी नार्को चाचण्यांचे काही सत्र घेतल्याच्या एक दिवसानंतर हे घडले. मात्र, टेस्टशी संबंधित काही सेशन 1 डिसेंबरलाही होणार आहेत.

ब्रेन मॅपिंग म्हणजे काय?

ब्रेन मॅपिंगच्या माध्यमातून गुन्हेगार किंवा संशयिताचे मन वाचण्याचा प्रयत्न केला जातो. गुन्हेगाराच्या डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचे यंत्र बसवले जाते आणि त्यानंतर चाचणीच्या वेळी त्याच्या मेंदूचा अभ्यास केला जातो. त्याच्या मनात चालणाऱ्या लहरी वाचल्या जातात. जर त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर चाचणी दरम्यान त्याच्या मेंदूच्या लहरी मशीनमध्ये बसवलेल्या सेन्सर्सद्वारे सहज पकडल्या जातील. ब्रेन मॅपिंगची चांगली गोष्ट म्हणजे त्यात कोणतेही रासायनिक पदार्थ वापरलेले नाहीत.

वाचा - आफताबच्या नार्को टेस्टची पोलिसांची तयारी पूर्ण; या प्रश्नांमधून उलगडणार हत्येचं गूढ

पॉलीग्राफ टेस्टमध्ये आफताबला कोणताही पश्चाताप नाही

आरोपी आफताबची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलीग्राफ चाचणीच्या पाच सेशनमध्ये आरोपीने गुन्हा कबूल करताना कोणताही पश्चाताप दाखवला नाही. खटल्यादरम्यान, आरोपीने हे देखील कबूल केले की आपण श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करुन जंगलात फेकून दिले होते. वास्तविक, पोलिसांचे म्हणणे आहे की मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली शस्त्रे आणि शरीराचे अवयव कोठे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी सांगितले की, आफताबने अनेक तरुणींसोबत डेटिंग केल्याचीही पुष्टी झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पॉलीग्राफ सेशनमध्ये आफताबचे वागणं सामान्य होतं. त्याने पोलिसांना सांगितले की त्याने श्रद्धाची हत्या कशी केली हे आधीच सांगितले आहे. आफताबवर मंगळवारी प्रयोगशाळेबाहेर सशस्त्र माणसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी दिल्ली कार्यालयात पॉलीग्राफ चाचणीसाठी आणण्यात आले.

आफताब पूनावालाला 12 नोव्हेंबरला अटक

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याला 12 नोव्हेंबरला तिच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (वय 27) हिचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 36 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तो अनेक दिवस तिच्या शरीराची विल्हेवाट लावत होता.

First published:

Tags: Crime news, Delhi, Murder