नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची सोमवारी वैद्यकीय चाचणी होणार आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांची तिसरी बटालियन सोमवारी सकाळी साडेसात वाजता आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. तेथे त्याची वैद्यकीय चाचणी होईल. येथे डॉक्टर त्याच्या शरीराचे सर्व पॅरामीटर्स तपासतील. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून आफताबची नार्को चाचणी सुरू होणार आहे. सहसा ही चाचणी 2 ते 3 तासात पूर्ण होते. या प्रकरणात देखील इतकाच वेळ लागू शकतो. पण, काही पॅरामीटर्सला जास्त वेळही लागण्याची शक्यता आहे.
अनेक गुढ प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांना पूर्ण तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रश्नांमध्ये कट कसा आखला, मोबाइल डेटामध्ये काय आहे, मोबाइलमधून कोणते पुरावे हटवले गेले, दोघांमधील संबंध किती खोलवर होते, कोणती शस्त्रे वापरली गेली, शस्त्र फेकण्याचे ठिकाण, हेतू काय होता? हत्येमागे तारीख, खुनाचा पुरावा, त्याच्या अॅपचा तपशील, आफताबच्या नवीन मित्राची माहिती असे अनेक प्रश्न आहेत.
वाचा - श्रद्धा वालकर हत्याकांड: 3 वेळा आफताबची पॉलिग्राफ टेस्ट फेल; आता पोलिसांनी घेतला हा निर्णय
पॉलीग्राफ चाचणीनंतरही आफताब नॉर्मल
तिहारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पॉलीग्राफ चाचणीतून आल्यानंतरही सामान्यपणे वागत आहे. कारागृहात आल्यानंतर त्याने जेल मॅन्युअलनुसार दिलेले जेवण खाल्ले. आफताब कित्येक तास झोपला होता. रात्रभर तो आरामात झोपला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भिती नव्हती. आफताबच्या सेलमध्ये 2 अंडर ट्रायल कैदी आहेत. हे दोघेही चोरीच्या गुन्ह्यात तिहार तुरुंगात बंद आहेत. आफताबने या कैद्यांना कारागृहातील जेवणाच्या दर्जाबाबत विचारलं. मात्र, आफताब श्रद्धा प्रकरणावर त्यांच्याशी बोलला नाही. जेव्हा-जेव्हा त्यांनी श्रद्धाशी संबंधित प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आफताबला राग यायचा. या विषयावर बोलू नका, असं तो म्हणायचा.
आफताबची इंटरनेट हिस्ट्री काढणार
श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाची इंटरनेट हिस्ट्री काढण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल, गुगल पे, पेटीएम यासह अनेक अॅप्सकडून डेटा मागवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटोने माहिती दिली आहे की आफताब आधी दोन लोकांसाठी जेवण ऑर्डर करायचा, पण काही दिवसांनी तो फक्त एकाच व्यक्तीसाठी जेवण ऑर्डर करू लागला. श्रद्धा आणि आफताब 8 मे रोजी मुंबईहून दिल्लीला शिफ्ट झाले होते. आफताबने 10 दिवसांनी म्हणजेच 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news