मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पहाटे 3 वाजता पत्नीच्या डोक्यात घातली गोळी; काँग्रेसच्या माजी प्रवक्त्याचं धक्कादायक कृत्य

पहाटे 3 वाजता पत्नीच्या डोक्यात घातली गोळी; काँग्रेसच्या माजी प्रवक्त्याचं धक्कादायक कृत्य

पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर आरोपीने घरातील बंदूक बाहेर काढली. यानंतर पत्नीने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र...

पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर आरोपीने घरातील बंदूक बाहेर काढली. यानंतर पत्नीने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र...

पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर आरोपीने घरातील बंदूक बाहेर काढली. यानंतर पत्नीने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र...

  • Published by:  Meenal Gangurde
ग्वाल्हेर, 6 जून : ग्वाल्हेरमध्ये काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेश प्रवक्त्यांनी आपल्या पत्नीला गोळी मारून हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती हत्यार घेऊन फरार झाला. ही घटना थाटीपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रीराम कॉलनीतील आहे. आरोपीने पत्नीची हत्या का केली, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (Shot in wifes head at 3 am Shocking act of a former Congress spokesperson) श्रीराम कॉलनीत राहणारे ऋषभ भदोरिया काँग्रेस पक्षात माजी प्रदेश प्रवक्ते होते आणि पत्नी , दोन मुलांसह राहत होते. सोमवार ऋषभ आपली पत्नी आणि दोन मुलांसह खोलीत झोपले होते. ऋषभ पहाटे 3 वाजता उठला आणि पत्नीसोबत भांडण करू लागला. वाद वाढल्यानंतर त्याने बंदूक काढली आणि तिच्यावर बंदूक ताणली. यानंतर पत्नी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी खोलीच्या बाहेर पळू लागली, यादरम्यान ऋषभने गोळी चालवली. ही गोळी थेट भावनाच्या डोक्याला लागली आणि गोळी लागताच ती जमिनीवर कोसळली. घटनास्थळावरच तिचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर आरोपीने बंदूक घेऊन तेथून पळ काढला. यावेळी दुसऱ्या खोलीत झोपलेले त्याचे आई-वडील जागे झाले आणि सूनेला रक्ताच्या थारोळ्यात पाहून धक्काच बसला. यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान पोलिसांनी चौकशी केली. मात्र कुटुंबीयांनी काहीच सांगितलं नाही. त्यामुळे हत्येच्या कारणाचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा स्पॉटवर हत्यार नव्हतं. त्यामुळे कोणत्या हत्याराने आरोपीने पत्नीची हत्या केली, हे कळू शकलं नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलं असून पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Young Congress

पुढील बातम्या