चेन्नई 30 ऑगस्ट : आई वडिलांनीच (Parents) आपल्या मुलांसोबत क्रूर कृत्य केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, तुम्ही कधी आईनं सामानासाठी आपल्या मुलीला दुकानदाराच्या हवाली केल्याचं ऐकलंय का? इतकंच नाही तर या घटनेत दुकानदारानं मुलीवर बलात्कार (Rape) करत त्याचा व्हिडिओही (Video) बनवला. ही घटना तमिळनाडूच्या (Tamil Nadu) चेन्नईमधून (Chennai) समोर आली आहे. पोलिसांनी (Police) तपासात आरोपी दुकानदाराकडून अल्पवयीन मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. बलात्कारच्या आरोपाखाली 35 दिवस तुरुंगात डांबलं,DNAटेस्टनंतर मुलाची निर्दोष सुटका टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, आरोपी दुकानदाराचं वय 48 वर्ष असून त्याचं नाव पेरुमल असं आहे. इथे दोन सख्ख्या बहिणींनी दुकानदाराकडून घेतलेली उधारी फेडण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलीवरच बलात्कार करण्याची परवानगी दिली आणि याचे व्हिडिओ बनवण्यासही परवानगी दिली. इतकंच नाही तर या दोघींनी आपल्या मुलींशिवाय आपल्या तीन मुलींनाही दुकानदाराच्या हवाली केलं. या पद्धतीनं दोन्ही बहिणींनी आपल्या दोन मुलींचा आणि मैत्रिणींना बलात्कारासाठी दुकानदाराच्या हवाली केलं. हसत्या खेळत्या कुटुंबाला कोरोनाची लागली नजर;पत्नीच्या निधनानंतर पतीनंही दिला जीव या भयंकर घटनेता खुलासा तेव्हा झाला जेव्हा पोलिसांना हे समजलं की दुकानदार बॅन तंबाखू विकतो. यानंतर पोलिसांनी बॅन तंबाखूसोबत दुकानदाराचा मोबाईलही जप्त केला. यात अल्पवयीन मुलींसोबत केलेल्या गैरकृत्याचे 50 व्हिडिओ आढळले. सुरुवातीला पोलिसांना वाटलं, की आरोपी दुकानदारानं हे व्हिडिओ इंटरनेटवरून डाऊनलोड केले आहेत. मात्र, हे व्हिडिओ नीट पाहिले असता यात पेरुमलच असल्याचं लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी दुकानदाराची चौकशी केली असता त्यानं सर्व गोष्टी सांगितल्या. दुकानदारानं पोलिसांनी सांगितलं, की मागील सहा महिन्यांच्यात त्यानं पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे. या घटनेचा खुलासा होताच पोलिसांनी आरोपी दुकानदारासह दोन बहिणींना अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.