जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बलात्कारच्या आरोपाखाली 35 दिवस तुरुंगात डांबलं, DNA टेस्टनंतर 12वीच्या मुलाची निर्दोष सुटका

बलात्कारच्या आरोपाखाली 35 दिवस तुरुंगात डांबलं, DNA टेस्टनंतर 12वीच्या मुलाची निर्दोष सुटका

बलात्कारच्या आरोपाखाली 35 दिवस तुरुंगात डांबलं, DNA टेस्टनंतर 12वीच्या मुलाची निर्दोष सुटका

17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती प्रेग्नंट झाल्याचा आरोप 18 वर्षीय मुलावर होता. पण, डीएनए चाचणीनंतर हा मुलगा निर्दोष (Boy accused in POCSO released after negative DNA test) असल्याचं सिद्ध झालं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : कित्येक वेळा न केलेल्या गुन्ह्यांसाठीही आतापर्यंत अनेकांना मोठी शिक्षा भोगावी लागल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका व्यक्तीला विनाकारण 19 महिने सौदी अरेबियामधील तुरूंगात राहावं लागलं होतं. तसाच प्रकार आता समोर आला असून, केरळमधील एका अल्पवयीन मुलालाही (Minor boy accused of rape) चुकीच्या आरोपाखाली तब्बल 35 दिवस तुरूंगात रहावं लागल्याचं समोर आलं आहे. एका 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती प्रेग्नंट (Kerala minor raped and impregnated) झाल्याचा आरोप या मुलावर होता. पण, डीएनए चाचणीनंतर हा मुलगा निर्दोष (Boy accused in POCSO released after negative DNA test) असल्याचं सिद्ध झालं. यानंतर त्याला ज्या पॉक्सो न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती, त्याच न्यायालयाने या मुलाची मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या 35 दिवसांमध्ये त्याला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचं काय? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. केरळच्या तिरुरंगडीजवळ (Tirurangadi) तेन्नाला (Tennala) गावातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. यातूनच ती गरोदर राहिली होती. याचा आरोप बारावीतील एका मुलावर ठेवण्यात आला (Minor boy accused in rape) होता. त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत (Kerala minor booked under POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपण पीडित मुलीला ओळखत होतो, मात्र तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नसल्याचं हा मुलगा वारंवार सांगत होता. तरीही, त्याला चौकशीच्या नावाखाली तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं होतं.

    ‘प्रेयसीला बोलावलं तर आत्मा भटकत राहील’; सुसाइड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

    द हिंदुने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी या मुलाला मध्यरात्री त्याच्या घरातून (Kerala boy DNA test) ताब्यात घेतलं होतं. त्याला कशासाठी ताब्यात घेतलं जात आहे याबाबत त्याच्या कुटुंबियांना काहीही न सांगता त्याला थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. “पोलीस स्टेशनला जाईपर्यंत गाडीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल मला शिवीगाळ करत होते. तसंच, पोलीस स्टेशनमध्ये चौकशीदरम्यान (Kerala minor mistreated during interrogation) माझ्या गुप्तांगावर पेपर स्प्रे मारण्याची धमकीही पोलिसांनी दिली.” असं या मुलाने म्हटलं आहे.

    तरुणीनं 12 हून अधिकांसोबत केलं लग्न; आईलाही नाही लागला तपास, अखेर फुटलं बिंग

    या मुलाला दुसऱ्या दिवशी हातात बेड्या घातलेल्या अवस्थेतच मुलीच्या घरी नेण्यात आलं होतं. “मला गेल्या एका महिन्याच्या काळात दोन पोलीस स्टेशन आणि तीन तुरूंगांमध्ये नेण्यात आलंय. कालपकांचेरी पोलीस स्टेशनमध्ये मला अत्यंत वाईट वागणूक (Kerala boy POCSO case) मिळाली. तिथल्या सब इन्स्पेक्टरने मला कानाखाली मारल्यानंतर कित्येक दिवस मला त्या कानाने नीट ऐकूही येत नव्हतं. मी निर्दोष आहे हे आता सिद्ध झालं आहे. मात्र, या सगळ्यात माझं जे नुकसान झालं त्याचं काय?” असा प्रश्न या मुलाने विचारला आहे. या सर्व प्रकाराचा मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास या मुलाला सहन करावा लागला. या बलात्कार प्रकरणाचा योग्य तो तपास करुन, लवकरात लवकर खऱ्या आरोपींना अटक करण्यात यावी, असं मत या मुलाने व्यक्त केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात