जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पगार मागितल्यानं मालकाला राग अनावर; कामगारासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांकडून आरोपीचा शोध

पगार मागितल्यानं मालकाला राग अनावर; कामगारासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांकडून आरोपीचा शोध

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

कळंबोलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कामगाराने पैसे मागितल्याचा राग आल्यानं दुकानदाराने कामगारासोबत धक्कादायक कृत्य केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 डिसेंबर : कळंबोलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पगाराचे राहिलेले पैसे मागितल्याच्या रागातून दुकान मालकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने कामगारावर हल्ला केला. या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला आहे. या कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छोटू रामसागर राय असं या घटनेतील पीडित कामगाराचं नाव आहे. शिवीगाळ करत मारहाण   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा सर्व प्रकार कळंबोली वसाहतीमधील ए वन स्वीट मार्ट दुकानामध्ये घडला आहे.  छोटू रामसागर राय हा या दुकानात काम करतो. त्याने मालकाकडे पगाराचे राहिलेले पैसे मागितले. पगाराचे पैसे मागितल्याचा मालकाला राग आला. त्यानंतर मालक आणि त्याच्या सहकार्याने छोटू यांना शिवीगाळ करत हल्ला केला. या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेही वाचा :   नराधम पित्याचा आपल्याच मुलीवर बलात्कार; पीडितेने ऐनवेळी जबाब बदलला, तरीही ‘या’ एका कारणामुळे झाली 20 वर्षांची शिक्षा आरोपींविरोधात गुन्हा दाखल  दरम्यान माराहाण प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात