मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

लग्नानंतर 8 महिन्यातच इंजिनिअर मेघनाची आत्महत्या, औरंगाबादमधील धक्कादायक घटना

लग्नानंतर 8 महिन्यातच इंजिनिअर मेघनाची आत्महत्या, औरंगाबादमधील धक्कादायक घटना

लग्नानंतर 8 महिन्यातच इंजिनिअर मेघनाची आत्महत्या (प्रातिनिधिक फोटो)

लग्नानंतर 8 महिन्यातच इंजिनिअर मेघनाची आत्महत्या (प्रातिनिधिक फोटो)

engineer woman commits suicide after 8 months of marriage: लग्नानंतर आठ महिन्यातच इंजिनिअर महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

औरंगाबाद, 23 ऑक्टोबर : एका इंजिनिअर (Engineer) असलेल्या महिलेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (Commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद (Aurangabad) मध्ये ही घटना घडली असून मृत महिलेचे नाव मेघना सूर्यवंशी असे आहे. मेघना या इलेक्ट्रिक इंजिनअर (Electric Engineer) होत्या. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघना इलेक्ट्रिक इंजिनिअर होत्या. आठ महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह अंकुश यांच्यासोबत झाला होता. अंकुश सूर्यवंशी हा सुद्धा एक इंजिनिअरच आहे. अंकुश गुरुवारी कामावरुन घरी परतला तेव्हा मेघना घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तात्काळ मेघनाला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

वाचा : शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी Suicide note आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, मेघना आणि अंकुश यांचा विवाह फेब्रुवारी 2021 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. त्यातच अंकुश याचे बाहेर अन्य मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मेघनाला आला. यानंतर मेघनाने अंकुशचा मोबाइल तपासला असता फोनमध्ये त्या मुलीसोबत केलेली चॅटिंग दिसून आली. यानंतर मेघनाने याबाबत अंकुशला विचारले अससता दोघांत कडाक्याचे भांडण झाले.

या भांडणानंतर मेघनाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली असं बोललं जात आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मेघनाच्या कुटुंबीयांनी मेघनाचा मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला होता. जोपर्यंत पती अंकुश याच्याविरोध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मेघनाच्या नातेवाईकांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मेघनाचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.

बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष

छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची असून विष प्राशन करुन तिने आपलं जीव संपवण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा वारंवार तिची छेड काढत असेल. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबाला सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाला जाब विचारुन समजही दिली होती. वारंवार होत असलेल्या या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने शुक्रवारी विष प्राशन केले. या घटनेनंतर तिला उपचारासाठी बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणात तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाहीये. या प्रकऱणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime, Suicide