मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

काय चाललंय काय? शाळेत विद्यार्थ्याने आणला देशी कट्टा, VIDEO बनवून केला व्हायरल

काय चाललंय काय? शाळेत विद्यार्थ्याने आणला देशी कट्टा, VIDEO बनवून केला व्हायरल

शाळेत वह्या पुस्तकांऐवजी विद्यार्थी (Shocking video of school students with gun goes viral) देशी कट्टा आणि काडतुसं घेऊन असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाळेत वह्या पुस्तकांऐवजी विद्यार्थी (Shocking video of school students with gun goes viral) देशी कट्टा आणि काडतुसं घेऊन असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाळेत वह्या पुस्तकांऐवजी विद्यार्थी (Shocking video of school students with gun goes viral) देशी कट्टा आणि काडतुसं घेऊन असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news
बाडमेर, 22 ऑक्टोबर : शाळेत वह्या पुस्तकांऐवजी विद्यार्थी (Shocking video of school students with gun goes viral) देशी कट्टा आणि काडतुसं घेऊन असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पाटी, पेन्सिल, दप्तर, वह्या, पुस्तकं या गोष्टी येतात. मात्र राजस्थानमधील बाडमेरमध्ये (Crime in school) गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या हातातही बंदुका आणि काडतुसं दिसत आहेत. विद्यार्थ्याने शाळेत देशी कट्टा आणून त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तो (Student shot video and puts on social media) काही ठिकाणी व्हायरल होत आहे. ‘न्यूज 18 लोकमत’ अशा व्हिडिओचं समर्थन करत नाही. समाजासाठी चिंतेची बाब शाळेत खुलेआम विद्यार्थ्यांनी देशी कट्टा घेऊन येणं आणि त्याला कुणीही प्रतिबंध न करणं ही अत्यंत गंभीर घटना मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाडनेरमधील विद्यार्थी देशी कट्टे आणि काडतुसंदेखील शाळेत घेऊन जात असल्याचं दिसून आलं आहे. ताज्या घटनेत गुडामालानी परिसरातील 11 वीत शिकणारे विद्यार्थी देशी कट्टे घेऊन फिल्मी स्टाईलनं शाळेत धुमाकूळ घालताना दिसले. एवढंच नव्हे, तर त्यांनी आपला एक व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावरून प्रसारित केला. हा व्हिडिओ 19 ऑक्टोबरचा असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून तपास सुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ परिसरात व्हायरल होत असूनही कुणीच या विद्यार्थ्यांना जाब विचारलेला नाही. ना शाळेच्या प्रशासनानं याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली, ना विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना रोखलं. राजस्थानमधील वाढत्या गुंडगिरीची ही लक्षणं असून भावी पिढी कशा पद्धतीनं गुंडगिरीकडं वळत आहे, याचंच हे उदाहरण असल्याचं पोलीस सांगतात. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा धाक वाटण्याऐवजी शिक्षकच जिवाच्या भीतीने शांत राहत असल्याचे अनुभव येत आहेत. या प्रकऱणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे वाचा- पती आणि पत्नी करायचे अश्लील गोरखधंदा, समजल्यावर व्हाल हैराण; वाचा पूर्ण घटना विद्यार्थ्यांकडून पुन्हा मारहाण विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना मारहाण होण्याचे प्रकारदेखील सुरू आहेत. शालेय विद्यार्थ्याने काही मित्रांच्या मदतीने इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
First published:

Tags: Crime, Police, Rajasthan, Student

पुढील बातम्या