जोधपुर, 5 फेब्रुवारी : काळवीट शिकार आणि आर्म्स अॅक्ट प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता सलमान खान कोर्टात हजर होण्यासाठी जोधपूरला येणार नाही. उच्च न्यायालयाने सीजे इंद्रजीत मोहंती आणि न्यायाधीश मनोज गर्ग यांच्या खंडपीठाने सलमान खान याची याचिका स्विकारली आहे. (Jodhpur High Court grants relief to Salman Khan) या प्रकरणात सलमान खान 6 फेब्रुवारी रोजी जोधपूर सत्र न्यायालयात हजर होणार होता.
मात्र सलमान खान याची कोर्टात वर्च्युअल उपस्थितीबाबत याचिका दाखल केली होती. अखेर सलमान खानची याचिका मंजुर करण्यात आली असून सध्या त्याला हजेरीसाठी जोधपूर न्यायालयात येण्याची गरज नसेल.
हे ही वाचा-अभिनेता सोनू सूदला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे BMCला आदेश
दोन दशकांपासून सुरू आहे सलमान खानवर खटला-
सलमान खानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केसेस सुरू आहेत. सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान 1998 मध्ये राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्याला 6 दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते, त्यानंतर या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. (Jodhpur High Court grants relief to Salman Khan) या प्रकरणात सलमान खानला दोन वेळा जोधपूर तुरुंगात जावं लागलं आहे. या प्रकरणात सलमान खान व्यतिरिक्त तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, आणि निलम यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Salman khan