अलीराजपुर, 21 ऑक्टोबर : सूरतमधील (Surat News) न्यू सिटी लाइट भागातील एका प्रमुख बिल्डरच्या ऑफिसात तब्बल 1 कोटी रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात क्राइम ब्रान्चच्या टीमने बुधवारी एमपीमधून दोन भावांना अटक केली आहे. चोरीची घटना 10 ऑक्टोबर रोजी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डरच्या ऑफिसरमधून 90 लाखांची चोरी झाली होती. या आरोपींच्या घराच्या मागील बाजूला शेतात त्यांनी 98.8 लाखांची कॅश खड्डा खणून पुरली होती. (he became a thief to make his beloved an officer 1 75 crore Stolen from the office)
मिळालेल्या माहितीनुसार, या भावांनी तब्बल 1.75 कोटींची चोरी केली ( 1.75 crore Stolen from the office) आहे. मात्र तक्रार दाखल करताना पीडित व्यक्तीला लॉकरमध्ये ठेवलेल्या रकमेची माहिती नव्हती. अद्यापही चोरांकडून 76 लाख रुपये मिळालेले नाहीत. आरोपीने काही पैसे आपल्या प्रेयसीच्या वडिलांनाही दिले आहेत.
या प्रकरणात सूरत पोलिसांनी एमपाल मंडलोई पटेल आणि त्याचा भाऊ नेपाल यांना अटक केली असून दोघांनी घराजवळ पैसे लपवून इंदूरमध्ये राहायला गेले होते.
हे ही वाचा-पठ्ठ्याने घराच्या परसबागेत फुलवली गांजाची शेती; पोलिसांच्या नजरेत येताच असे हालऑफिस बॉयची करीत होता नोकरी
एमपाल मंडलोई वेस्टर्न कंस्ट्रक्शनच्या कार्यालयात ऑफिस बॉयची नोकरी करीत होता. तो कॅश कुठे ठेवली जाते याकडे लक्ष देत होता. लॉकरच्या चाव्या कुठे आहेत हे देखील त्याला माहिती झालं होतं. संधी साधून त्याने कार्यालयातच चोरी केली. अटकेनंतर त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी 5 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी त्याने चोरी केली.
प्रेयसीला अधिकारी बनविण्यासाठी केली चोरी..
काही मीडिया रिपोट्सनुसार, आरोपी एका शिक्षित तरुणीवर प्रेम करीत होता. तिला मोठं अधिकारी व्हायचं होतं. तिच्या तयारीसाठी पैशांची गरज होती. गर्लफ्रेंडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपालने चोरी केली. त्याने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली असून या प्रकरणात तपास सुरू आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.