Home /News /crime /

बलात्कार आणि जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरण, शिवसेनेच्या केदार दिघेंना सर्वात मोठा दिलासा

बलात्कार आणि जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरण, शिवसेनेच्या केदार दिघेंना सर्वात मोठा दिलासा

शिवसेनेचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाणे सेशन कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

    ठाणे, 6 ऑगस्ट : शिवसेनेचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाणे सेशन कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. बलात्कार आणि जीवे ठार मारण्याच्या धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स बजावलं होतं. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी दिघेंनी कोर्टात धाव घेतली होती. विशेष म्हणजे सेशन कोर्टाने दिघेंना दिलासा दिला आहे. केदार दिघे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. रोहित कपूर या बड्या व्यावसायिकाने अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला होता. तर संबंधित प्रकरणी कुठेही वाच्यता करु नकोस. पैसे घे आणि कुठेही बोलू नकोस. नाहीतर तुला संपवू, अशी धमकी केदार दिघे यांनी दिली होती, अशी तक्रार पीडितेनी केली होती. विशेष म्हणजे संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केदार दिघे देखील दिसत होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर केदार दिघे यांच्याविरोधात कलम 506 नुसार पीडितेला धमकावण्याचा आणि त्यांचे मित्र रोहित कपूर विरोधात कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच पोलिसांनी आनंद दिघे यांना चौकशीसाठी समन्सही बजावलं होतं. (राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपने दंड थोपटले; खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांचंच केलं पाचारण) ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या कामामुळे ठाण्यात शिवसेनेचा पाया भक्कम झाला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यातील सर्व नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत आनंद दिघे यांच्यासोबत रक्ताचं नातं असलेले केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना नुकतीच ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Shiv sena

    पुढील बातम्या