Home /News /crime /

नागपुर हत्याकांडाची मोठी अपडेट; मुलांची करणार DNA चाचणी, आरोपीबाबत महत्त्वाचा खुलासा होणार

नागपुर हत्याकांडाची मोठी अपडेट; मुलांची करणार DNA चाचणी, आरोपीबाबत महत्त्वाचा खुलासा होणार

जेव्हा आलोख मेव्हणीच्या घरी गेला तेव्हा तिने मोबाइलमधील रेकॉर्डर सुरू ठेवला होता. त्यामुळे त्या अर्धा तासात काय घडलं याचं रेकॉर्डिंग पोलिसांकडे असल्याचंही सांगितलं जात आहे.

नागपूर, 24 जून : नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 5 लोकांची हत्या करून नंतर आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. अलोक माटूळकर या व्यक्तीने आधी मेव्हणी, सासू त्यानंतर स्वत:च्या घरी येऊन पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या केली होती. यानंतर त्याने गळफास घेऊन स्वत:लाही संपवलं होतं. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहे. (Nagpur Murder) मेव्हणीसोबत होते अनैतिक संबंध? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलोक माटुळकर आणि त्याची मेव्हणी अनिशा बोबडे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. ज्या दिवशी हे हत्याकांड घडल त्याआधी दोघांमध्ये मोबाइलवरुन संभाषण झालं होतं. अनिशाने इतर मुलांशी बोलले त्याला आवडत नव्हतं, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. दरम्यान अलोख आधी त्यांच्या घरी गेला व अनिशासोबत वाद घालू लागला. यावेळी चाकूने त्याने तिचा गळा चिरला. यावेळी सासू अडवायला आली तेव्हा अलोखने त्यांचीही हत्या केली. या सर्व प्रकारानंतर तो घरी गेला आणि पत्नी आणि मुलांनी हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती समोर येत आहे. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आलोख अनिशाच्या घरी गेला तेव्हा तिने मोबाइलमधील रेकॉर्डर सुरू ठेवला होता. त्यामुळे त्या अर्धा तासात काय घडलं याचं रेकॉर्डिंग पोलिसांकडे असल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान अनिषाला आपला जीव धोक्यात असल्याची चुणूक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा-नागपुरात दुपारी 12 वा. काय घडलं? हसतं-खेळतं माटूळकर कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त आता पोलीस आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध घेत आहे. आरोपी अलोक माटूळकर हा मानसिक विकृत होता का, की परिवारातील सदस्यांच्या बद्दल त्याच्या मनात आधीपासून राग होता या दोन अँगलवर पोलिसांचा तपास सुरू आहे. यासाठी आलोकची मुलगी परी व मुलगा साहिल यांची डीएनए टेस्ट करण्यात येणार असून ही मुले आलोकची होती की नाही यातून घटनेमागचे कारण शोधण्यात पोलिसांना मदत होणार आहे. घटनाक्रमानुसार आलोकने सुरुवातीला सासू लक्ष्मी बोबडे व मेव्हणी अनिशा बोबडे यांची हत्या केली. त्यांनतर 100 मीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या राहत्या घरी आला. तेथे त्याने आपली पत्नी विजया, 14 वर्षाची मुलगी परी यांचे हातपाय बांधले व गळा आवरुन हत्या केली. तर 12 वर्षाचा मुलगा साहिल याची उशीने नाक दाबून हत्या केली व त्यानंतर स्वत: देखील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. अलोख माटूळकर हा बाहेर शांत व घरात रागीट असल्याने हत्येच्या करणामागील निष्कर्षावर पोहचण्यासाठी फॉरेन्सिक अहवाची मदत घेतली जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime, Murder, Nagpur

पुढील बातम्या