मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शबनमच्या कृत्याने मानशास्त्रज्ञही हादरले; हत्‍याकांडामागे असू शकतात 'ही' कारणं

शबनमच्या कृत्याने मानशास्त्रज्ञही हादरले; हत्‍याकांडामागे असू शकतात 'ही' कारणं

प्रियकराने सांगितलं आणि तिनं कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यामागे शबनमची स्वत:ची मानसिक स्थिती जबाबदार राहिली असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

प्रियकराने सांगितलं आणि तिनं कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यामागे शबनमची स्वत:ची मानसिक स्थिती जबाबदार राहिली असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

प्रियकराने सांगितलं आणि तिनं कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यामागे शबनमची स्वत:ची मानसिक स्थिती जबाबदार राहिली असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

लखनऊ, 18 फेब्रुवारी: उत्तर प्रदेशमधील अमरोहाच्या शबनमला (Shabanam) लवकरच फाशी देण्यात येणार आहे. प्रेम प्रकरणावरून कुटुंबातील सात जणांची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या शबनमचे दोन वेगवेगळे चेहरे समोर आले आहेत. प्रेमावरून झालेल्या या हत्याकांडामुळे मानसोपचार तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. शबनमनं केलेलं हे कृत्य सामान्य नाही आणि फक्त प्रेमच यासाठी कारणीभूत असू शकतं, असं नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

प्रेम प्रकरणावरून हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण शबनम प्रकरण काही सामान्य नाही. अशाप्रकारची घटना अशीच होऊ शकत नाही, यामागे अनेक कारणं असू शकतात, असं मानसोपचार तज्ज्ञ म्हणालेत. या प्रकरणावर त्यांचं एकंदरच काय मत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

दिल्लीचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप बोहरा म्हणाले, "शबनम प्रकरण एकदम असामान्य आहे. अशा प्रकारची घटना फक्त प्रेम प्रकरणामुळे (Love Affair) घडली असावी असं म्हणू शकत नाही. प्रेम संबंधाला विरोधासोबत आणखी काय कारण आहे याबाबत तिच्या जवळच्या व्यक्तीलाच माहिती असू शकते. पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की, हे तिच्या गुन्हेगारी किंवा हिंसक प्रवृत्तीमुळे झाले आहे. शबनमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडली असावी की, त्यामुळे तिच्या मनात द्वेष (Hate) निर्माण झाला असावा. तिच्या मनात राग आणि सूडबुद्धिची भावना एवढी वाढत गेली की त्याचं रुपांतर गुन्ह्यात (Heinous Crime) झालं"

ते पुढे म्हणाले, "ही सामान्य घटना नाही की प्रियकराने सांगितलं आणि तिनं कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यामागे शबनमची स्वत:ची मानसिक स्थिती जबाबदार राहिली असेल. अशा प्रकारच्या घटनांमध्ये असं दिसून येतं की काही लोकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती असते आणि ते हिंसाचाराच्या दरम्यान या पातळीवर पोहोचतात. शबनम महिला आहे पण अशा घटनांमध्ये त्याचा काहीही संबंध नाही. हे महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतं. असं सांगितलं जातं की, तिच्या प्रेमसंबंधाला आई-वडिलांनी विरोध केला होता पण ही भारतात सामान्य गोष्ट आहे. आई-वडील प्रेमसंबंधाच्या विरोधात असता अशा परिस्थितीत एक तर आई-वडिलांपासून किंवा प्रियकर किंवा प्रेयसीपासून वेगळे होण्याचे प्रकार घडतात. पण ज्या लोकांच्या मनामध्ये खूप राग, नाराजी, सुडबुद्धीची भावना भरलेली असेल तर ते शबनमसारखे गुन्हे करतात"

हे वाचा -  iPad च्या चार्जरसाठी महिलेने आपल्या चौथ्या पतीची केली निर्घृण हत्या, चाकूने केले अनेक वार

तर दुसरीकडे मानसोपचार तज्ज्ञ निशा खन्ना म्हणाल्या, "शबनम सामान्य मुलगी असू शकत नाही. प्रेमात हिंसाचाराच्या घटना समोर येतात पण ही घटना वेगळी आहे. हे डिसोसिएटिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डरचे (dissociative personality disorder) प्रकरण असू शकते. ज्यामध्ये प्रेम आणि द्वेषाचा कोणताही भाग जास्त हाइलाइट होतो. यामध्ये ब्रेनवॉश हा देखील एक पैलू असू शकतो. तिचा प्रियकर सलीमने तिचा ब्रेनवॉश इथपर्यंत केला असेल त्यामुळे शबनमच्या मनात आपल्या कुटुंबाबद्दल राग राहिला असेल. सामाजिक स्तरावर किंवा समोर दिसणारी जी गोष्ट सर्वांना आवडेल तिच गोष्ट त्या व्यक्तीलाही आवडेल असं नाही. शबनम सुशिक्षित मुलगी आहे. मुस्लिम कुटुंबातून असूनही तिनं एमएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तिला आपल्या कुटुंबाकडून खूप प्रेम मिळालं. पण इथं एक प्रश्न उपस्थित होतो की तिला शिकण्याची इच्छा होती का किंवा असंही होऊ शकते तिला शिक्षणाऐवजी लग्न करायचं होतं किंवा नोकरी करायची होती. तिनं आठवी पास व्यक्तीवर प्रेम केलं. हे पूर्णपणे मानसिकता आणि प्रभावावर अवलंबून आहे"

निशा खन्ना पुढे म्हणाल्या की, "बऱ्याच प्रकरणांमध्ये असं दिसून आलं की शिक्षण हे जीवनातील सर्वात चांगल्या कामांपैकी एक समजलं जातं आणि ते घेतलंच पाहिजे. पण अनेकदा असं होतं की गुन्हेगार त्यासाठी तयार नसतो आणि त्याला बळजबरीने ते करावं लागतं. ज्याच्यामुळे तो जास्तच आक्रमक बनतो. असंही असू शकतं की शबनमला शिकण्याची इच्छा नसेल तिला दुसरं काही तरी करायचे असेल. जर आपण या गुन्ह्याकडे पाहिले तर गुन्हेगार केवळ योग्य आणि अयोग्य यावर विश्वास ठेवतो. त्याला जे योग्य वाटते तेच तो मिळवण्याचा प्रयत्न करतो."

हे वाचा - 'राजकारण्यांमुळे वाढला कोरोना; वेळीच आवर घातला नाहीतर लाटा येतच राहणार'

"शबनम सुशिक्षित होती. तिच्या कुटुंबाने तिला एमएपर्यंत शिक्षण दिले. ती शिक्षिका झाली तर असं म्हटलं जाईल की शिक्षणाचा गुन्हा करण्याशी काहीही संबंध नाही. पण एक सुशिक्षित व्यक्ती देखील गुन्हा करू शकतो", असं डॉ. संदीप म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Crime news, Death Sentence, Uttar pardesh