मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /iPad च्या चार्जरसाठी महिलेने आपल्या चौथ्या पतीची केली निर्घृण हत्या, चाकूने केले अनेक वार

iPad च्या चार्जरसाठी महिलेने आपल्या चौथ्या पतीची केली निर्घृण हत्या, चाकूने केले अनेक वार

Murder Story: आयपॅडचा (iPad) चार्जर न दिल्याने एका महिलेनं आपल्या पतीची चाकूने अनेक वार करत निर्घृण हत्या (Murder) केली आहे.  या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Murder Story: आयपॅडचा (iPad) चार्जर न दिल्याने एका महिलेनं आपल्या पतीची चाकूने अनेक वार करत निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Murder Story: आयपॅडचा (iPad) चार्जर न दिल्याने एका महिलेनं आपल्या पतीची चाकूने अनेक वार करत निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लंडन, 18 फेब्रुवारी: कोणत्या कारणांमुळे कोणतं पाऊल उचललं जाईल, हे सांगता येत नाही. आयपॅडचा चार्जर न दिल्याने एका महिलेनं आपल्या पतीची चाकूने अनेक वार करत निर्घृण हत्या केली आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी हे प्रकरण पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील वेस्टन सुपर मारे जवळील बॅरो या गावात राहणाऱ्या 78 वर्षीय डेव्हिड जॅक्सनची (David jackson) हत्या करण्यात आली आहे. 65 वर्षीय निवृत्त CA असणाऱ्या पेनेलोप जॅक्सनने (penelope jackson) ही हत्या केली आहे. या दाम्पत्याच्या जावयाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा या जोडप्यात भांडणं झाली, तेव्हा दोघंही स्वयंपाकघरात होते. आयपॅड फोनच्या चार्जरवरून त्यांच्या दोघांत वाद झाला असल्याचा दावा, दाम्पत्याचा जावई जेरेमी मुलिंस याने केला आहे.

शवविच्छेदन अहवालानुसार, माजी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक गोल्फ क्लबचे कॅप्टन डेव्हिड जॅक्सन यांच्यावर चाकूने अनेक वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्या बहिणीने सांगितल्यानुसार, या जोडप्यात कधीही भांडण झालेलं नाही. ते दोघंही एकमेकांचा खूप आदर करायचे. त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या दोघांत पैसे किंवा मालमत्तेवरुन कधीही वाद झाला नाही. ते दोघंही आनंदाने जीवन जगत होते, अशा परिस्थितीत त्यांच्या हत्येमागचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, काही नातेवाईकांच्या मते सीए पेनेलोप जॅक्सनचं हे चौथं लग्न होतं. यापूर्वी तिची तीन लग्नं झाली होती. पेनेलोप तिच्या पहिल्या नवऱ्याची एक मुलगी आणि इतर मुलांना घेवून डेव्हिडसोबत राहत होती. डेव्हिड आणि पेनेलोप यांच्या लग्नाला 25 वर्ष झाली होती. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या डीआय रोजर डोक्ससेनं सांगितलं की, घटनेचा तपास सध्या प्राथमिक स्तरावर असल्याने याबाबत फारसं काही बोलू शकत नाही.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder