कोल्हापूर, 27 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे आजची युवा पिढी ही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसते आहे. मात्र, याच सोशल मीडियावरुन झालेल्या ओळखीतून अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले गेले. याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणाला आजरा पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पीडित अल्पवयीन मुलगी ही आजरा तालुक्यातील मासेवाडी येथील आहे. तर आरोपी सूरज संभाजी सुतार (वय-23) हा राधानगरी तालुक्यातील कोणोलीपैकी असंडोली येथील आहे. सूरज सुतारविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सुतार हा सुतारकाम करतो. मागील आठ महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर त्याची मासेवाडी येथील अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. या ओळखीतून आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला सूरजने लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले. तसेच तिच्यासोबत आठ दिवस शारीरिक संबंध ठेवले. यानंतर याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन आजरा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले तर सूरजला अटक केली. हेही वाचा - पुणे : तीन मुलांच्या बापाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, प्रेयसीने लग्नाचा तगादा लावला अन् यानंतर यातील अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर सूरज सुतारविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर आल्यानंतर कशाप्रकारे फसवणूक केली जाऊ शकते, याचे उदाहरण समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.