पुणे, 7 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. दाम्पत्याला गुंगीचे औषध देऊन नोकरानेच 24 लाख लंपास केले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ज्येष्ठ दाम्पत्य पिंपळेवस्ती-मुंढवा परिसरात राहते. या ज्येष्ठ दाम्पत्याला नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन, रोकड, हिरे, सोन्याचे दागिने असा तब्बल 26 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, सकाळी जेव्हा दोघांना जाग आली तेव्हा नोकर घरातून पसार झालेला होता.
याप्रकरणी एका 37 वर्षांच्या महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नोकर नरेश शंकर सौदा (वय 22) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढव्यातील पिंगळे वस्तीमधील फॉरेस्ट कॅसलमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
फिर्यादी महिलेचे आई-वडील हे सेवानिवृत्त झाले आहेत. ते दोघे एकटेच राहतात. त्यांना घरातील कामासाठी नोकराची गरज होती. यामुळे त्यांना ऑनलाइन नोकराची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या एका कंपनीने नोकर उपलब्ध करुन दिला होता. या कंपनीच्या मार्फत मुंबईहून त्यांनी नरेश याला कामासाठी पुण्यात आणले होते. आरोपी नरेश हा मूळचा नेपाळचा आहे. मागील एक महिन्यापासून तो त्यांच्याकडे काम करत होता.
नोकरासाठी असलेल्या खोलीत तो राहात होता. पगाराचे पैसेदेखील त्याने महिना पूर्ण झाल्यानंतर घेतले होते. दरम्यान, रविवारी रात्री फिर्यादींच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर घरातील रोकड, सोन्याचे, हिऱ्याचे दागिने असा 23 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळ काढला.
हेही वाचा - पुणे : ज्याच्यासोबत सुरू होता वाद त्याला दिलं सोडून अन् भांडण सोडवणाऱ्यावरच कुऱ्हाडीने वार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gold robbery, Pune