पुणे, 7 डिसेंबर : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर चार दिवसात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या. यात एकाच मृत्यू झाला आहे. अशातच कोंढव्यात आतेभावाची भांडणं सोडवण्यासठी गेलेल्या दोघांना चार जणांनी कुऱ्हाडीने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैनुद्दीन यांचा आतेभाऊ जैद याची इतरांसोबत भांडण सुरू होते. त्यावेळी त्याने हे भांडण सोडवण्यासाठी जैनुद्दीन आणि मोसीन यांना फोन करून बोलावून घेतले. ते दोघे भांडण सोडवण्यासाठी आले असता, टोळक्याने दोघांना लोखंडी कुऱ्हाड व रॉड डोक्यात मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सौद व त्याचे चुलते इम्रान मुजावर यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
वाचा - पुण्यात नग्णअवस्थेतील मनोरुग्णाला बेदम मारहाण, व्हायरल व्हिडिओने खळबळ
या प्रकरणी जैद बागवान (वय 32), अवेज बागवान (वय 35), ईश्ताक बागवान (वय 33, सर्व रा. ब्रह्मा मॅजेस्टिक सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा) आणि एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 307, 323, 504, 506, 34, आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जैनुद्दीन सलाकउद्दीन शेख (वय 22, रा. ईशा लॉरेल सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.
चार दिवसात दोन ठिकाणी गोळीबार
पिंपरी चिंचवड शहरातील भाटनागर परीसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी मोबाईल घेण्याच्या शुल्लक कारणावरून हवेत गोळीबार करण्यात आला. हवेत 5 ते 6 राऊंड फायर केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक गोळीबारचा आवाज झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी असाच गोळीबार झाला होता. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी पोलीस कारवाई करणार का? अशा प्रश्न शहरवासीय उपस्थित करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.