मराठी बातम्या /बातम्या /Viral /

‘थप्पड गर्ल’नंतर आता ‘बुक्की बॉय’ची चर्चा, छेड काढणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात मारहाण, पाहा VIDEO

‘थप्पड गर्ल’नंतर आता ‘बुक्की बॉय’ची चर्चा, छेड काढणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात मारहाण, पाहा VIDEO

तरुणीने (young girl) शेरेबाजी (taunt) करून छेडछाड (teasing) केल्याचं सांगत एका तरुणाने (young boy) भर रस्त्यात तिची धुलाई (beaten) केली आहे.

तरुणीने (young girl) शेरेबाजी (taunt) करून छेडछाड (teasing) केल्याचं सांगत एका तरुणाने (young boy) भर रस्त्यात तिची धुलाई (beaten) केली आहे.

तरुणीने (young girl) शेरेबाजी (taunt) करून छेडछाड (teasing) केल्याचं सांगत एका तरुणाने (young boy) भर रस्त्यात तिची धुलाई (beaten) केली आहे.

  • Published by:  desk news

लखनऊ, 14 सप्टेंबर : तरुणीने (young girl) शेरेबाजी (taunt) करून छेडछाड (teasing) केल्याचं सांगत एका तरुणाने (young boy) भर रस्त्यात तिची धुलाई (beaten) केली आहे. या घटनेचं अनेकांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण केलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये अपलोड केला. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ऑगस्टमध्येच लखनऊमध्ये एका तरुणीनं कॅब चालकाला केलेल्या मारहाणीची घटना चांगलीच गाजली होती. त्यानंतर टेम्पो चालकाची एका महिलेनं चपलेनं केलेल्या धुलाईचीदेखील जोरदार चर्चा रंगली होती. आता या ‘बुक्की बॉय’ची चांगलीच चर्चा शहरात सुरू आहे.

अशी घडली घटना

उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील मेट्रो स्टेशन परिसरात ही घटना घडली. एक तरुण तरुणीची यथेच्छ धुलाई करत असल्याचं पाहून तिथं मोठी गर्दी जमली. हा तरुण रागाने थरथरत होता आणि तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. तरुणी मदतीसाठी उपस्थितांकडे याचना करत होती. मात्र उपस्थितांपैकी कुणीही सुरुवातीला तिच्या मदतीसाठी आलं नाही. गर्दीतील बहुतांश नागरिक हे मोबाईलवर या घटनेचं चित्रिकरण करण्यातच मग्न असल्याचं  दिसलं.

कुणीतरी मला वाचवा, अशा किंकाळ्या ही तरुणी फोडत होती. काही नागरिक तरुणाची समजून घालण्याचा दूरूनच प्रयत्न करत होते. मात्र त्यातील कुणाचंही न ऐकता तरुण तरुणीला मारहाण करत होता. काही वेळाने एका तरुणाने पुढाकार घेत मारहाण करणाऱ्या तरुणाच्या ताब्यातून तरुणीला सोडवले. त्यानंतर तरुणीला शिव्या घालत हा तरुण तिथून निघून गेला.

हे वाचा -रक्तपात! तालिबाननं पुन्हा मोडलं वचन, पंजशीरमध्ये 20 जणांची हत्या

पोलिसांनी केली कारवाई

शहरात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता या तरुणीने आपल्याला अश्लिल शेरेबाजी केली आणि आपण जाब विचारला असता आपल्याला शिव्या घातल्याचं त्यानं सांगितलं. याचा राग आल्यामुळेच आपण तरुणीवर हात उचलल्याचं या तरुणानं म्हटलं आहे. अद्याप मारहाण झालेली तरूणी पोलिसांकडे आलेली नाही. तिने तक्रार दिली नाही, तर सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याच्या आरोपाखाली या तरुणावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Video viral, Video Viral On Social Media