मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Semen Terrorism : आवडत्या तरुणीच्या कॉफीच्या कपात टाकलं वीर्य; 'या' देशात महिलांना केलं जातय टार्गेट

Semen Terrorism : आवडत्या तरुणीच्या कॉफीच्या कपात टाकलं वीर्य; 'या' देशात महिलांना केलं जातय टार्गेट

गेल्या काही वर्षांत स्त्रियांना लज्जास्पद वाटावं यासाठी काही पुरुषांनी वीर्याचा (Semen) वापर केल्याच्या अनेक घटना या देशात घडल्या आहेत

गेल्या काही वर्षांत स्त्रियांना लज्जास्पद वाटावं यासाठी काही पुरुषांनी वीर्याचा (Semen) वापर केल्याच्या अनेक घटना या देशात घडल्या आहेत

गेल्या काही वर्षांत स्त्रियांना लज्जास्पद वाटावं यासाठी काही पुरुषांनी वीर्याचा (Semen) वापर केल्याच्या अनेक घटना या देशात घडल्या आहेत

    सोल, 14 ऑगस्ट : दक्षिण कोरिया (South Korea) आणि उत्तर कोरिया (North Korea) हे देश आपापसात संघर्षामुळे चर्चेत असतात. परंतु, सध्या दक्षिण कोरिया हा देश सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या देशात गेल्या काही काळापासून सीमेन टेररिझम (Semen Terrorism) म्हणजेच वीर्य दहशतवादाच्या घटना वाढताना दिसत आहेत. या माध्यमातून तिथल्या महिलांना (Women) लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सीमेन टेररिझम किंवा वीर्य दहशतवाद हा गंभीर लैंगिक गुन्हा (Sex Crime) समजला जावा, यासाठी देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात (Law) सुधारणा व्हावी, अशी मागणी दक्षिण कोरियातले काही नेते करत आहेत. सीमेन टेररिझम म्हणजे नेमके काय, दक्षिण कोरियात हा प्रकार कसा वाढतोय, याबद्दलचं वृत्त`आज तक`ने दिलं आहे.

    गेल्या काही वर्षांत स्त्रियांना लज्जास्पद वाटावं यासाठी काही पुरुषांनी वीर्याचा (Semen) वापर केल्याच्या अनेक घटना दक्षिण कोरियामध्ये घडल्या आहेत. मे 2021 मध्ये एका शासकीय सेवकाने 6 महिन्यांच्या कालावधीत 6 वेळा आपल्या महिला सहकाऱ्याच्या कॉफीच्या कपामध्ये वीर्य टाकल्याचं स्पष्ट झालं होते. या व्यक्तीच्या कृत्यामुळे कॉफीचा कप (Coffee Cup) खराब झाला असल्याची टिप्पणी तेथील न्यायालयाने (Court) केली होती; मात्र तो गुन्हा गंभीर असल्याचं भाष्य करण्यात आलं नव्हतं. कारण तशी तरतूद कायद्यात नाही.

    2019 मध्ये एका व्यक्तीने एका महिलेच्या चपलांवर वीर्य टाकून ते खराब करण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने या व्यक्तीला 435 डॉलर्सचा दंड ठोठावला होता. अशा प्रकरणात लैंगिक गुन्ह्याचे आरोप लावण्याची तरतूद नसल्याने मालमत्ता नुकसानीचे आरोप लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं; मात्र अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यात एका आरोपीला 3 वर्षांची शिक्षा झाली होती. या व्यक्तीने एका महिलेच्या कॉफीच्या कपात लैंगिक इच्छा निर्माण होणाऱ्या औषधासह वीर्य टाकलं होतं. या व्यक्तीला ती महिला आवडत होती, परंतु, त्या महिलेचा या व्यक्तीला नकार होता. त्यामुळे बदला घेण्यासाठी या व्यक्तीने असे कृत्य केले होते. या प्रकरणात महिलेसोबत कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नव्हती, तर तिला फक्त लज्जास्पद वाटावं म्हणून हे कृत्य करण्यात आल्याने तो कायद्याने सेक्स क्राइम ठरू शकला नाही. अशा घटनांनंतर दक्षिण कोरियात या प्रकरणांना `सीमेन टेररिझम` असं संबोधलं जाऊ लागलं. स्थानिक मीडियानं सातत्यानं अशा घटना समाजासमोर मांडल्या आहेत.

    हे ही वाचा-Freezer मध्ये नग्न अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, 5 महिन्यांपासून होती गायब

    सीमेन टेररिझमच्या वाढत्या घटना पाहता सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा व्हावी आणि सीमेन टेररिझम हा गंभीर सेक्स क्राइम म्हणजेच लैंगिक गुन्हा मानला जावा, अशी मागणी तिथले नेते करू लागले आहेत. प्रत्येक सेक्स क्राइम किंवा लैंगिक गुन्हा हा एक गंभीर अपराध असतो. अशा प्रकरणांना किरकोळ हिंसेचं स्वरूप दिलं जाऊ नये. कारण यात एका विशिष्ट लिंगाच्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं. त्यामुळे हा केवळ लैंगिक अपराधच नाही, तर याला हेट क्राइमच्या श्रेणीतदेखील समाविष्ट करावं, अशी मागणी कोरियन महिला लिंकच्या (Korean Women Link) सरचिटणीस चोई वॉन-जीन यांनी केली आहे.

    दक्षिण कोरियातल्या डेमॉक्रेटिक पक्षाचे बेक हाय युर्न हे स्वतः कायद्यावर संशोधन करत असून, सीमेन टेररिझमला सेक्स क्राइम म्हणून ग्राह्य धरलं जावं, याकरिता ते प्रयत्नशील आहेत. 2021 मध्ये एका महिलेच्या कॉफीच्या कपात सीमेन टाकण्याचा जो प्रकार घडला, त्यात महिलेला लज्जा उत्पन्न होण्यासाठी असं कृत्य करण्यात आलं होतं. असं असूनही हा प्रकार सेक्स क्राइम म्हणून ग्राह्य धरला गेला नाही. कारण या दोघांमध्ये थेट शारीरिक संबंध आला नव्हता. या प्रकारात कॉफीच्या कपाचं नुकसान झाल्याची टिप्पणी न्यायालयाने केली होती, परंतु, हा प्रकार त्यापेक्षाही धोकादायक आणि गंभीर असल्याचं बेक हाय युर्न यांनी द गार्डियनशी बोलताना सांगितलं.

    First published:

    Tags: Crime news, South korea, Women harasment, Women safety