कराकास, 13 ऑगस्ट : व्हेनेज्युएलातील अरागुवा राज्यात (Aragua State) एका हत्येचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह फ्रीजरमध्ये (Dead body in Freezer) सापडला आहे. तरुणीच्या शरीरावर 50 वेळा स्क्रू-ड्रायव्हरने वार करण्यात आल्याचं दिसून येत आहे. यावेळी तिचे हात बांधलेले होते. आणि तिचं डोकं पायांच्यामध्ये होतं. सांगितलं जात आहे की, ही तरुणी गेल्या 5 महिन्यांपासून गायब होती. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या नव्या प्रियकराचं नाव जोसु आहे. याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जोसुकडून बरेच खुलासे होऊ शकतील. शेजारच्यांनी सांगितलं की, हे कपल नेहमी वाद करीत होते. तरुणीच्या प्रियकराचं वागणं चांगलं नव्हतं. एना गॅब्रिएला (Ana Gabriela) हिच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. ही व्यक्ती तरुणीच्या चार वर्षांच्या मुलाचा बाप असल्याचं मानलं जात आहे. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने सांगितलं की, गेल्या अनेक दिवसांपासून ते एनाचा शोध घेत होता. जेव्हा बरेच दिवस एनाची काहीच माहिती मिळाली नाही, म्हणून मी तिच्या घरी गेलो. घरात गेलो तर तेथून खूप दुर्गंधी येत होती. यानंतर त्याने फ्रिज आणि फ्रिजरमध्ये पाहिलं तर त्याला धक्काच बसला. हे ही वाचा- सोशल मीडियावर डेटिंग…मीटिंग..सेक्स आणि धोका; बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात एना गॅब्रिएला हिचा (Ana Gabriela) मृतदेह पहिल्यांदा तिच्या एक्स-बॉयफ्रेंडने पाहिला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितलं की, फ्रीजरमध्ये तिचा नग्न मृतदेह पडला होता. तिच्या शरीरावर 50 वेळा स्क्रू-ड्रायव्हरने वार केले होते. तरुणीचा मृतदेह एखाद्या भृणाप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. तिचे हात बांधलेले होते आणि तिचं शिर पायांमध्ये होतं. मिररच्या बातमीनुसार, 5 महिन्यांपासून बेपत्ता 19 वर्षीय एना गॅब्रिएला मदीना ब्लँको (Ana Gabriela Medina Blanco) हिचा मृतदेह 29 जुलै रोजी व्हेनेज्युएलातील अरागुआ राज्यातील तिच्या घरात सापडला. स्थानिक मीडियानुसार, मृत तरुणीच्या शेजारच्यांनी सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये तिला शेवटचं पाहण्यात आलं होतं. एना अनेकदा व्हेनेज्युएलाची राजधानी कराकासमध्ये जात होती. त्यामुळे ती घरातून गायब झाली तरी कोणालाही हे लक्षात आलं नाही. एना गॅब्रिएलाच्या (Ana Gabriela) सावत्र वडिलांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की, ती देशातील एका वेगळ्यात भागात राहत होती आणि कधी तरी आमचं बोलणं होत होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.