अंजलि सिंह राजपूत लखनऊ, 11 जुलै : उत्तरप्रदेश राज्यातील एसडीएम ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. आता ज्योती यांचे पती आलोक त्यांच्या जुळ्या मुलींसाठी माफी मागण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर उत्तर प्रदेशच्या माजी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सत्या सिंह यांनी भाष्य केले आहे. काय म्हणाल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी? जोपर्यंत पती-पत्नीमधील प्रकरण खाजगी राहते, तोपर्यंत हे प्रकरण सुटण्याची शक्यता जास्त आहे. ज्योती मौर्य यांचे पती आलोक यांनी सोशल मीडिया आणि मीडियामध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला. यामुळे त्याने फक्त समाजात ज्योतीची इज्जत समाजात कमी केली आणि चारित्र्यहनन केले तर शिवाय स्वतःची खिल्लीही उडवून घेतली. ज्योती मौर्यासारखे अधिकारी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक बलवान आहेत. त्यामुळेच तिने आत्महत्या असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नाही. तिच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर आजूबाजूचे लोक तिच्याकडे बोटे दाखवत, विविध विनोद, कमेंट करत असताना कोणत्याही महिलेने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असते, असेही त्या म्हणाल्या.
हे पाऊल उचलण्यापूर्वी आलोकने आपल्या जुळ्या मुलींचा विचार करायला हवा होता. आता त्यांच्या दोन मुलींचे संपूर्ण भविष्य त्यांच्यासमोर आहे. त्यांच्या मुली लग्न करून समाजात कुठेही जाणार, हे प्रकरण त्यांच्यासमोर येणार नाही का? लोक त्यांना प्रश्न विचारणार नाहीत का? असा प्रश्नही त्यांनी केला. तसेच लोक तोंडावर बोलत नसले तरी पाठीमागे सगळे त्यांच्या मुलींनाच टोमणे मारतील. आलोकने घेतलेला मार्ग पाहता आता हे नात्यातील ही समस्या सुटेल असे वाटत नाही. सत्या सिंह पुढे म्हणाल्या की, ही संपूर्ण घटना सोशल मीडिया आणि मीडियामध्ये मांडण्यापूर्वी आलोक जे आता बेधडकपणे आरोप करत आहे, त्याने जरा जास्त हिंमत दाखवून त्याच्या आणि ज्योतीच्या घरच्यांना बोलावून बसून बोललं असतं तर कदाचित हे प्रकरण सुटलं असतं. पण ज्या प्रकारे आलोकने थेट मीडियात जाऊन एका महिलेच्या चारित्र्याला बदनाम केले, ते अत्यंत चुकीचे आहे. आता दोघेही आयुष्यात कधीच एकमेकांना सामोरे जातील, असे वाटत नाही. अशा परिस्थितीत आलोक त्याला हवी तशी माफी मागू शकतो. आता या नात्यात माफ करण्यासारखे काही नाही. तरीही ज्योतीला माफ करायचे असेल तर ती माफ करू शकते कारण, हा दोघांचा वैयक्तिक निर्णय आहे, असेही त्या म्हणाल्या. एका महिलेच्या माध्यमातून समाजातील सर्व पुरुष आणि सर्व लोकांनी ज्या प्रकारे सर्व महिलांना लक्ष्य केले आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. याचा परिणामही आगामी काळात दिसणार आहे. तसेच कायदेशीररित्या पती-पत्नी असूनही जर तुम्ही दुसरे लग्न केले तर तो गुन्हा आहे. यामध्ये मोठी शिक्षा आहे, पण पुरावे पूर्ण असावेत, असेही त्या म्हणाल्या.