सोनीपत, 16 डिसेंबर : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एका मुलीचे अपहरण करून तिचे बळजबरीने धर्मांतर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह इतर हिंदू संघटनांनी याचा निषेध करत हिंदू मुलगी आणि एका विशिष्ट समाजातील मुलाला पकडून गन्नौर पोलीस ठाण्यात आणले. मुलीच्या नातेवाईकांच्या वतीने मुलगी बेपत्ता झाल्याची नोंदही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत राहणारी एक हिंदू मुलगी आणि तिचे नातेवाईक गणौर बादशाही रोडवरील एका पीरकडे भूतबाधा दूर करण्यासाठी येत असत. याठिकाणी या मुलीची भेट भूतबाधा दूर करणाऱ्या एका विशेष समुदायाच्या बाबूला नावाच्या व्यक्तीसोबत झाली. मुलीचे म्हणणे आहे की, 7 डिसेंबर रोजी बाबूलाल दिल्लीत आला आणि त्याने पाण्यात काही पदार्थ मिसळले आणि ते पाणी तिला प्यायला लावले. तसेच रात्री घरून पैसे व दागिने आणण्यास सांगितले. बाबूलालच्या सांगण्यावरून ती तिचे दागिने आणि पैसे घेऊन बाबूलालसोबत त्याच्या गावी आली. यादरम्यान बाबुलाल आणि इतर काही तरुणांनीही तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, तो तिला वारंवार ड्रग्ज देत होता आणि तिला हरिद्वारलाही घेऊन गेला होता. बाबुलाल स्वतः विवाहित असूनही त्याने या मुलीशी कोर्टात लग्न केल्याचा आरोप आहे. नंतर बाबूलाल एका विशिष्ट समाजाचा असल्याचे कळताच बाबूलालने तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. हेही वाचा - जीम, प्रेम आणि धोका, कंटाळून तिने नदीत उडी मारली पण तो माघारी आलाच नाही, अखेर… मंगळवारी बाबूलाल आणि त्याचा मित्र साहिल तिला गन्नौर जीटी रोडवरून सोनिपतच्या दिशेने ऑटोमध्ये घेऊन जात असताना गन्नौर येथील मुलीच्या नातेवाईकांनी तिला पाहिले आणि पकडले. तर यावेळी बाबूलाल पळून जाण्यात यशस्वी झाला, तर त्याचा साथीदार साहिल जागीच पकडला गेला. हिंदू संघटनांना याची माहिती मिळताच तेही घटनास्थळी पोहोचले आणि तरुणीची बाजू जाणून घेत निषेध करत साहिल नावाच्या तरुणाला पकडून गन्नौर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तरुणीकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि भूतबाधेचा सामान जप्त केला आहे. तसेच सोनीपत पोलिसांनी तरुणी आणि साहिल नावाच्या तरुणाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा लव्ह जिहादचा विषय असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद गन्नौरचे गटमंत्री नरेंद्र पांचाळ यांनी केला. पकडलेल्या तरुणाने स्वत: समोरच कबुली दिली आहे की, त्यांची एक मोठी टोळी आहे. तसेच त्यांनी या माध्यमातून अनेक मुलींचे अशा प्रकारे धर्मांतर केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.