भोपाळ 19 नोव्हेंबर : सरकारी विभागांमध्ये भ्रष्टाचार होतो, असं सर्रास म्हटलं जातं. पण सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा नमुना दाखवणारं एक प्रकरण मध्य प्रदेशमधून उघडकीस आलंय. महत्त्वाचं म्हणजे कार्यालयातील क्लार्कने हा भ्रष्टाचार केला आहे. सिवनी जिल्ह्यातील तहसीलदार ऑफिसच्या एका लेखनिकावर तब्बल 11 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याने तब्बल 279 जणांना कागदोपत्री मृत दाखवून हा घोटाळा केला. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सगळीकडे याचीच चर्चा होत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. जिल्ह्यातील तहसील कार्यालय केवलारी येथे सचिन दहायत नावाचा लेखनिक काम करायचा. तो अकाउंट सेक्शनचं काम बघायचा. या सेक्शनचं कामकाज बघताना त्याने मोठा घोटाळा केलाय. सचिनने अनेक जिवंत लोकांना कागदावर मृत दाखवलं, यामध्ये अनेक खोट्या नावांचाही समावेश आहे. त्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचं भासवत बनावट आदेश काढून शासनाकडून मंजूर झालेली चार लाख रुपयांची मदत रक्कम मिळवली. त्याने हा संपूर्ण घोटाळा महसूल पुस्तक परिपत्रकाच्या कलम-6 क्रमांक-4 म्हणजेच आरबीसी 6-4 अंतर्गत केला आहे. ..अन् संधी मिळताच महिलेचा बिर्याणी हाऊसमध्येच डल्ला; पंढरपूरमधील चोरीच्या घटनेचा CCTV Video एखादा शेतकरी, भूमिहीन व्यक्ती किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीचा पाण्यात बुडून, सर्पदंश, वीज पडून किंवा अशा इतर कारणांमुळे मृत्यू होतो, तेव्हा सरकारच्या महसूल विभागाकडून आरबीसी 6-4 अंतर्गत या लोकांना 4 लाख रुपयांची मदत मंजूर केली जाते. ऑडिटमधून उघडकीस आला घोटाळा आरोपी क्लार्कने महसूल विभागाच्या पोर्टलवर पाण्यात बुडून, सर्पदंश, वीज पडून मृत्यू झाल्याची खोटी प्रकरणं अपलोड केली. त्यानंतर मदतीची रक्कम मंजूर झाल्यानंतर एकूण 11 कोटी 16 लाख रुपये बँक खात्यात जमा करून घेतले. अलीकडेच महसूल विभागात ऑडिट झालं असता हा घोटाळा समोर आला. ऑडिटमध्ये अशी 40 बँक खाती दिसली, ज्यात दोन ते तीन वेळा मदतीचे पैसे जमा करण्यात आले होते. 8 बँकांची अशी एकूण 40 खाती होल्ड करण्यात आली आहेत. महसूल विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आदेश पत्रात लेटर पे ते सील आणि सहीपर्यंत सर्व काही बनावट असल्याचं आढळून आलंय. mumbai crime : सोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या गुन्हेगाराचा खून, 2 दिवस अलिशान कारमध्ये होता मृतदेह दीड वर्ष सुरू होता घोटाळा “हा घोटाळा मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान करण्यात आला होता. यादरम्यान कोणालाही याबद्दल कल्पना नव्हती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केवलारी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्या क्लार्कला निलंबित केलं असून विभागीय चौकशी सुरू आहे,” अशी माहिती केवलारीचे तहसीलदार हरीश लालवानी यांनी दिली. “तहसीलदारांच्या तक्रारीवरून आरोपी क्लार्कविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे. आरोपी लेखनिक फरार असून त्याचा शोध सुरू आहे,” असं एसपी रामजी श्रीवास्तव यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.