मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पगार अवघा 5 हजार आणि कोटींचं 'साम्राज्य'; सत्य समोर आल्यानंतर अधिकाराही हैराण

पगार अवघा 5 हजार आणि कोटींचं 'साम्राज्य'; सत्य समोर आल्यानंतर अधिकाराही हैराण

 शिक्षण विभागात अवघ्या 5 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणारा कम्प्युटर ऑपरेटर कोट्यवधी असल्याचं समोर आलं आहे.

शिक्षण विभागात अवघ्या 5 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणारा कम्प्युटर ऑपरेटर कोट्यवधी असल्याचं समोर आलं आहे.

शिक्षण विभागात अवघ्या 5 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणारा कम्प्युटर ऑपरेटर कोट्यवधी असल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

राजस्थान, 4 सप्टेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) भीलवाडामधील शिक्षण विभागात अवघ्या 5 हजार रुपयांच्या पगारावर नोकरी करणारा कम्प्युटर ऑपरेटर कोट्यवधी असल्याचं समोर आलं आहे. शिक्षण विभागात करार तत्वावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याजवळ तब्बल 2 कोटी 15 लाखांची फेरफार (Fraud) करीत आपला व्यवसाय उभा केला होता. (Salary only 5 thousand and crores of empire authorities shocked after the truth came out)

भीलवाडा जिल्ह्यातील कोटडी पंचायत समिती खेडा राजकीय विद्यालयात गोपाल सुवालका नावाची एक व्यक्ती संविदावर कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करीत होती. गोपालने 2007 ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत फसवणूक करीत विभागाचे पैसे गायब करीत होता. मात्र कोणालाच याबाबत माहिती नव्हती. तो विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावटी आयडी आणि पासवर्डने वर्षानुवर्षे शिक्षण विभागातील पैशांची अफरातफर करीत होता. ही सर्व रक्कम तो बायकोच्या बँक खात्यात जमा करीत असे. असं करीत त्याने बायकोलाही बनावटी पद्धतीने शिक्षक बनवलं होतं. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ; एक एक करीत सोडला जीव

या पैशातून त्याने दोन घरं, आणि एक जेसीबी मशीन खरेदी केली होती. आरोपीने  या पैशातून उभा केलेला वाहनांचा व्यवसाय पंजाबपर्यंत पसरला होता. कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करीत असताना तो कोट्यवधी झाला होता. स्वत: केवळ 5 हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या या व्यक्तीने स्वत:च्या भाच्याला पीए म्हणून ठेवलं होतं.

जेव्हा आरोपीचं पितळ उघड पडू लागलं तर त्याने सर्व रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केली. या प्रकरणात कम्प्युटर ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Money fraud, Rajasthan