मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ; 3 दिवसात एक एक करीत सदस्यांनी सोडला जीव

एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ; 3 दिवसात एक एक करीत सदस्यांनी सोडला जीव

आतापर्यंत या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला असून नेमक्या या आजारामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.

आतापर्यंत या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला असून नेमक्या या आजारामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.

आतापर्यंत या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला असून नेमक्या या आजारामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

मोतिहारी, 4 सप्टेंबर : बिहारमधील (Bihar News) चंपारणमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांच्या (Family Five death) मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. सांगितलं जात आहे की, एका अज्ञात आजारामुळे तीन दिवसात घरातील एक एक करीत सर्वांचा मृत्यू झाला. ही घटना मोतिहारीमधील मुफ्फसिल पोलीस ठाणे हद्दीतील आहे. सातत्याने होत असलेल्या मृत्यूच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. (Sensation in the area due to the death of 5 members of the same family bihar news)

सततच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी, डॉक्टरांकडून तपास सुरू

मुफ्पसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात अचानक झालेल्या मृत्यूंमुळे परिसरात दहशत पसरली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसात पाच आणि गेल्या सहा महिन्यात या कुटुंबातील 8 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, या कुटुंबाच्या घराच्या मागे भलमोठं झाड होतं. जे सहा महिन्यांपूर्वी पडलं होतं. कुटुंबीयांनी त्यांना सांगितलं की, त्यानंतर या घरात मृत्यूच्या घटना सुरू झाल्या आहेत.

हे ही वाचा-Shocking Video : अमेरिकेत पावसाचा हाहाकार; भिंत तोडून पुराचं पाणी शिरलं घरात

जाणून घ्या काय म्हणाले डॉक्टर..

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, झाड पडल्यानंतर कुटुंबीय भुताचा परिणाम मानून तांत्रिकाकडे गेले आणि त्याच्याकडून उपचार करू लागले. डॉक्टरांनी सांगितलं की, आज झालेल्या मृत्यू प्रकरणातील मृतदेहांच्या नाका-तोंडातून फेस येत होता आणि एका मृतदेहाच्या कानातून रक्त निघत होता. जो सर्पदंश किंवा विष घेतल्यामुळे झाल्याची शक्यता आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर याबाबत नेमका खुलासा होईल.

पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा

डॉक्टरांनी सांगितलं की, महासाथीच्या तज्ज्ञांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ते मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहे. मृत व्यक्तीचं कुटुंबीय सीता देवा आणि सरिता देवी यांनी सांगितलं की, पोटदुखीनंतर गळ्यात वेदनाच्या तक्रारी जाणवत होत्या, त्यानंतर काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. मृत प्रियांशच्या वडिलांनी सांगितलं की, गेल्या सहा महिन्यात 8 लोकांचा मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Death