जळगाव, 19 फेब्रुवारी : मध्यप्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांनी आयाेजित केलेल्या रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रमात गुरुवारी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अवघ्या 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. त्या बाळाला चालता येत नसल्याने रुद्राक्ष पाण्यात ठेवून पाणी पिल्यानंतर बरे वाटत असल्याची माहिती त्या चिमुकल्याच्या पालकांना देण्यात आली होती. परंतु झालेल्या गर्दीत त्या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
ते बाळ जन्मापासूनच उभे राहू शकत नव्हते. तीन वर्षे झाले तरी त्याचे पाय शरीराचा भारच उचलत नव्हते. यासाठी रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पिल्यावर बरे हाेईल या आशेने त्याला रुद्राक्ष महोत्सवासाठी नेण्यात आले होते. परंतु, देवाने त्यालाच घेऊन टाकल्याची या भावना बाळाचे पिता विवेक भट यांनी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशातील सिहाेर येथे रुद्राक्ष महाेत्सवासाठी गेलेल्या तीन वर्षांचा बालक अमाेघ याने प्राण गमावला आहे.
कुबेरेश्वर धाम में आये लोगों में एक और मौत, जलगाँव के विनोद भट्ट के तीन साल के बेटे अमोघ की तबियत ख़राब थी उम्मीद से आये थे मगर यहाँ आते ही और हालत बिगड़ी और आज सिहोर अस्पताल में दम तोड़ दिया. कल एक महिला की भी मौत हो गई थी, कई बीमार अब भी अस्पताल में @ABPNews @abplive pic.twitter.com/Ko4p3dvHP0
— Nitinthakur ABN NEWS (@Nitinreporter5) February 18, 2023
हे ही वाचा : बल्बसाठी सीसीटीव्ही चेक केले, पण महिलेला ‘त्या’ अवस्थेत बघून रहिवाशी हादरले; मुंबईतील धक्कादायक घटना
दरम्यान विवेक भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मुलाला घेऊन प्रचंड गर्दीतून 15 ते 20 किलाेमीटर पायी चालत गेले, पिण्यास पाणी नव्हते. अशा अव्यवस्थेमुळे अनेक भाविक जखमी झाले. जळगाव शहरातील शनिपेठेत राहणाऱ्या विवेक भट यांनी या गर्दीतच आपला 3 वर्षांचा मुलगा गमावला. भट यांना 3 वर्षांपूर्वी अमोघ हा दुसरा मुलगा झाला. सामान्य बालक 6 महिन्यांचे झाल्यावर चालायचा प्रयत्न करतात. परंतु अमाेघ तसे करत नाही, म्हणून त्याला शहरातील डाॅक्टरांकडे दाखवले. त्यांनी फिजिओथेरपी केल्यास ताे चालू शकेल, असा सल्ला दिला हाेता.
सुरुवातीला काही महिने जळगावातच दिवसाला 200 रुपयेप्रमाणे उपचार केले. परंतु, नंतर बडाेदा येथील बहिणीकडे तेथील ट्रस्टच्या दवाखान्यात अवघ्या 60 रुपयांत फिजिओथेरपी हाेत असल्याने त्याला दीड वर्षापासून तेथेच ठेवून उपचार सुरू हाेते. पंडित प्रदीप मिश्रा हे रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पाजल्याने व्याधी बऱ्या हाेतात, अशी माहिती मिळाली हाेती.
हे ही वाचा : दिल्ली हादरली; चार वर्षांच्या मुलासमोर पत्नीसह दोन वर्षांच्या मुलाची केली हत्या, कारणही धक्कादायक
अखेर देवाकडेच बरे करा, असे मागावे म्हणून त्याला बडाेद्याहून जळगाव येथे आणले हाेते. ताे काही बरा तर झाला नाही, पण देवाने त्यालाच हिरावून नेले. हे सांगताना विवेक भट यांनी हंबरडा फोडला. त्याला ते पाणीदेखील देता आले नाही, असे भट म्हणाले.