परभणी, 12 फेब्रुवारी : रस्त्यात तरुणींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमिओला भररस्त्यात चांगलाच चोप (Road Romeo beaten) दिल्याची घटना समोर आली आहे. संतप्त झालेल्या तरुणीने बेल्टने या रोडरोमिओला धू-धू धुतला. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद (incident caught in mobile camera) झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना परभणी जिल्ह्यात (Parbhani district) घडली आहे. (Road Romeo beaten by brave girl in Parbhani, video goes viral in social media) सततच्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन युवतीने, मुलाला भररस्त्यात पट्ट्याने चोप दिल्याची घटना परभणी जिल्ह्यातील सेलू येथे घडली आहे. सेलू तालुक्यात राहणाऱ्या मुलीने रोडरोमिओला चांगलाच चोप देत अद्दल घडवली आहे. हा तरुण रवळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मुली ग्रामीण भागातून रोज शिक्षणासाठी सेलू येथील महाविद्यालयामध्ये यायचे, परंतु त्या दरम्यान हा मुलगा वारंवार छेडछाड करत असल्याचा आरोप या मुलीने केला आहे. वाचा : साताऱ्यात तरुणांच्या दोन गटांत जोरदार राडा, घटनेचा LIVE VIDEO व्हायरल या मुलाच्या कृत्याला कंटाळून शेवटी त्या मुलीने भर रस्त्यामध्ये पट्ट्याने या मुलाला चोप दिलाय. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले. परंतु तोपर्यंत अनेकांनी मोबाइलमध्ये हा व्हिडीओ शूट केला. आता या घटनेचा व्हिडीओ परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलीने धाडस दाखवत या रोडरोमिओला चांगलाच चोप दिला. भररस्त्यात या मुलीने रुद्रावतार दाखवला आणि रोडरोमिओला बेल्टने धुतलं. यावेळी हा रोडरोमिओ ढसाढसा रडू लागला. भररस्त्यात तरुणीने बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात करताच स्थानिक नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. या तरुणीने धाडस दाखवत वेळीच रोडरोमिओला चोप दिला. तिच्या या धाडसाचे आता सर्वत्र कौतुकही होत आहे. वाचा : सोलापुरात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; गुंडांकडून ऑन कॅमेरा खंडणी वसुली, घटनेचा LIVE VIDEO मोठ्या बहिणीला छेडणाऱ्याला धाकट्या बहिणीने चोपला काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मध्ये अशीच घटना समोर आली होती. मुलींना एकटे पाहून त्यांची छेड काढणं एका रोडरोमिओला चांगलेच महागात पडले होते. ज्या मुलींची छेड काढत होता त्या मुलींनीच त्याला चांगली अद्दल घडवली. आपल्या बहिणीकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या या रोडरोमिओला लहान बहिणीने चांगलेच बदडले आहे. औरंगाबादमधील ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.