बार्शी, 12 फेब्रुवारी: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) याठिकाणी दोन खंडणीखोरांनी एका व्यापाऱ्याला लुटल्याची (Businessman looted by 2 accused) धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी खडी क्रॅशरवर जाऊन व्यापाऱ्याला धक्काबुक्की करत त्यांच्याकडून 50 हजार रुपये रुपये उकळले (Looted 50 thousands) आहेत. हा धक्कादायक प्रकार पीडित व्यापाऱ्या जवळच्या एका कर्मचाऱ्याने मोठ्या हिमतीने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल (Viral video) होत आहे. या प्रकरणी पीडित व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यापाऱ्याचा खडी क्रॅशरचा व्यवसाय आहे. दोन खंडणीखोरांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी व्यापाऱ्यानं खंडणी देण्यास विरोध केला असता, आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली आहे. व्यावसायिकाला धमकावत आरोपींनी त्यांच्या 50 हजार रुपये वसूल केले आहेत.
हेही वाचा-Pune: हाय प्रोफाइल महिलांसोबत सेक्सचं दाखवलं स्वप्न; व्यावसायिकाला लाखोंचा गंडा
तसेच 'दर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील. तू पैसे कसे देत नाही, ते बघून घेतो' अशी धमकी देखील आरोपींनी व्यापाऱ्याला दिली आहे. हा सर्व प्रसंग पीडित व्यापाऱ्याच्या एका कर्मचाऱ्यांनं मोठ्या हिमतीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता आरोपी कशाप्रकारे व्यापाऱ्याला धमकावत आहेत. आरोपींनी यावेळी व्यापाऱ्याच्या कॉलरला पकडून त्यांना धक्काबुक्की केली आहे.
हेही वाचा-सख्खं नातंही विसरला नराधम; शेतात फरफटत नेत वहिनीवर अत्याचार, जालन्यातील घटना
तर अन्य एका खंडणीखोरानं हातात घातक वस्तू घेऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवानं या धक्काबुक्कीत कोणतीही विपरीत घटना घडली नाही. माझ्या पाठीशी चार-पाच पत्रकार आहेत. त्यामुळे तू माझं काही करू शकत नाही, अशी धमकी देखील आरोपीनं दिली आहे. आरोपींनी यापूर्वी देखील बार्शीतील अन्य व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केल्याचा संशय स्थानिकांकडू व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आरोपींवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.