जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अपघाताच्या 5 दिवसानंतर ऋषभ पंतला मुंबईला हलवणार, क्रिकेटरच्या प्रकृतीबद्दल मोठी Update

अपघाताच्या 5 दिवसानंतर ऋषभ पंतला मुंबईला हलवणार, क्रिकेटरच्या प्रकृतीबद्दल मोठी Update

अपघाताच्या 5 दिवसानंतर ऋषभ पंतला मुंबईला हलवणार, क्रिकेटरच्या प्रकृतीबद्दल मोठी Update

ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी बुधवारी मुंबईत हलवण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनी बुधवारी दिली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 04 जानेवारी : ऋषभ पंत चा शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. दिल्लीहून रुर्कीला घरी जात असताना त्याची गाडी महामार्गावर दुभाजकाला धडकली होती. अपघातानंतर जखमी अवस्थेत ऋषभ पंतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी बुधवारी मुंबईत हलवण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनी बुधवारी दिली. “मी पंतच्या आईच्या संपर्कात आहे. लिगामेंटच्या झीजवर उपचार करण्यासाठी आम्ही त्याला मुंबईला हलवू,” असं DDCA चे संचालक श्याम शर्मा यांनी ANI ला सांगितलं.

News18लोकमत
News18लोकमत

उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी मंगळवारी सांगितलं की, हरियाणा रोडवेजचा बस चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत नैन यांच्यासह क्रिकेटपटू ऋषभ पंतला अपघातादरम्यान मदत करणाऱ्या सर्व प्रवाशांचे तपशील पोलीस नोट करत आहेत. दरम्यान, ऋषभ पंतला भेटण्यासाठी लोकांनी गर्दी केल्यामुळे त्याला पुरेशी विश्रांती घेता येत नसल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे. Rishabh Pant Car Accident :BMW ला प्रचंड गती आणि एका सेकंदात….ऋषभ पंतच्या अपघाताचा LIVE VIDEO ऋषभ पंतची भेट घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रुग्णालयात येत आहेत. यामुळे तो विश्रांती घेऊ शकत नाहीये. पंतवर उपचार करणाऱ्या मेडिकल टीमच्या एका सदस्याने सांगितले की, क्रिकेटपटूला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी विश्रांतीची गरज आहे. दुखापतीचा त्याला अजूनही त्रास होत आहे. भेटायला येणाऱ्या लोकांशी तो बोलत आहे. अशा परिस्थितीत त्याच्या रिकव्हरीला वेळ लागू शकतो. त्यामुळे लोकांनी त्याला जास्ती जास्त विश्रांती घेऊ द्यायला हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात