जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना 

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना 

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना 

पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीसमोर एका रिक्षाचालकाने (Rikshaw Driver) हस्तमैथून केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 27 एप्रिल : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीसमोर एका रिक्षाचालकाने (Rikshaw Driver) हस्तमैथून केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली.  याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. सचिन शेंडगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. काय आहे नेमकी घटना -  शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक 12 वर्षीय मुलगी क्लासवरुन घरी जात होती. याचदरम्यान एक रिक्षाचालक विरुद्ध दिशेनं आला. तसेच तिला पत्ता विचारू लागला. आणि पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्याने त्या 12 वर्षीय मुलीसमोर हस्तमैथून केले. तर रिक्षाचालकाच्या या कृत्यामुळे मुलगी घाबरली. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिंजवडी पोलिसांकडे (Hinjewadi Police) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन आरोपी रिक्षाचालक सचिन शेंडगेला अटक केली आहे. हेही वाचा -  लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरीनं नवरदेवाला चपलीनं चोपलं; पतीवर केला गंभीर आरोप

पुण्यात रिक्षाचालकाने केला 12 वर्षीय मुलीचा विनयभंग - 

तर काही दिवसांपूर्वीच पुण्यातच एका रिक्षाचालकाने 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना बावधन (Bavdhan) परिसरात घडली होती. पीडित मुलगी खासगी शिकवणीहून परत येत होती. त्यावेळी ही घटना घडली. ही 12 वर्षीय पीडित मुलगी तिच्या स्टडी रुममधून बाहेर पडली. यानंतर दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास ती बावधन येथील एलएमडी चौकात आली. यानंतर तिथे एका रिक्षाचालक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ आला. यावेळी त्याने तिचा विनयभंग केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर ती मुलगी घरी गेली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर पुण्यातील मागील काही दिवसात याप्रकारच्या घटना घडल्यामुळे पुण्यात महिला असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात