जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुण्याला हादरवणाऱ्या 'त्या' घटनेची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराचा आढळला मृतदेह

पुण्याला हादरवणाऱ्या 'त्या' घटनेची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराचा आढळला मृतदेह

पुण्याला हादरवणाऱ्या 'त्या' घटनेची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराचा आढळला मृतदेह

काजल PSC ची तयारी करीत होती. एका छोटाशा गोष्टीवरुन तिने टोकाचं पाऊल उचललं.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 23 जुलै : गुरुवारी इंदूरमध्ये प्रियकर- प्रेयसीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रेयसीने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. प्रेयसीच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्यानं प्रियकरानं ट्रेनसमोर उडू घेऊन आत्महत्या केली. (repetition of incident that shock Pune)  काही दिवसांपूर्वी पुण्यातदेखील असाच प्रकार घडला होता. एका डॉक्टर दाम्पत्यापैकी महिलेने आधी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतीचा मृतदेहही घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. दोघांमधील वादानंतर महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. शुक्रवारी दुपारी रेल्वे ट्रॅकजवळ तरुणाचा मृतदेह सापडला. देवेंद्र (25 ) एका खासगी कंपनीत मार्केटिंगचं काम करीत होता. देवेंद्र हा रविदास नगर येथे राहणाऱ्या काजल कोटवालच्या प्रेमात होता. दोन दिवसांपूर्वी काही कारणास्तव दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर काजलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काजलच्या मृत्यूची बातमी ऐकताच शुक्रवारी दुपारी देवेंद्र बाहेर जात असल्याचं सांगून घरातून निघाला. यानंतर त्याने ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला आहे.

News18

हे ही वाचा-  पतीची लैंगिकता संपविण्यासाठी रचलं कारस्थान; रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह देवेंद्रच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, काजल PSC ची तयारी करीत होती. देवेंद्र आणि काजल यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी काजलच्या भावाने देवेंद्रला बहिणीसोबत राहू नको असं सांगितलं. यानंतरही दोघेही लपून -छपून भेट होते. काही दिवसांपूर्वी देवेंद्रने काजलला दुसऱ्या तरुणासोबत बोलताना पाहिलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. गुरुवारी रात्री उशिरा दोघे फोनवर बोलत होते. काही कारणामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर काजलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात