मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लग्नाच्या 9 महिन्यांनंतरही शरीरसंबंधास नकार; रागाच्या भरात पतीचं धक्कादायक पाऊल

लग्नाच्या 9 महिन्यांनंतरही शरीरसंबंधास नकार; रागाच्या भरात पतीचं धक्कादायक पाऊल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

आधी त्याने आपल्या मित्राला बोलावलं अन्...

  • Published by:  Meenal Gangurde
बंगळुरू, 18 ऑगस्ट : कर्नाटकातील बंगळुरूतून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याप्रकरणी पतीने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी शिराडी घाटाच्या दरीत फेकून आला. यानंतर पती पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती बिहार येथे राहणारा असून बंगळुरूमध्ये इलेक्ट्रीशियनचं काम करीत होता. आरोपीने 9 महिन्यांपूर्वी ज्योती कुमारीसोबत लग्न केलं होतं. आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की, तो पत्नीवर नाराज होता. लग्नाच्या वेळी पत्नीने तिच्या वयाबाबत चुकीची माहिती दिली होती. लग्नानंतर सेक्स करण्यास नकार... त्याने पोलिसांना सांगितलं की, पत्नी त्याला असभ्य म्हणत आणि शरीर संबंधात नकार देत होती. पत्नीने कुटुंबीयांना तिचं वय 28 वर्षे असल्याचं सांगितलं होतं. मात्र मूळात ती पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. आणि तिचं वय 38 वर्षे आहे. ती कधीच शरीर संबंधात तयार नव्हती आणि त्याला आणि कुटुंबीयांना असभ्य म्हणत असे. बायकोनं मध्यरात्री पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकले उकळतं पाणी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण पोलिसांनी पुढे सांगितलं की, रागाच्या भरात त्याने ज्योतीच्या हत्येचा प्लान रचला. यासाठी त्याने आपल्या मित्रालाही बिहारहून बोलावलं. 3 ऑगस्ट रोजी त्यांनी ज्योतीची गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिला मृतदेह फेकून दिला. यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांकडे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
First published:

Tags: Crime news, Murder, Wife and husband

पुढील बातम्या