उत्तर प्रदेश, 21 एप्रिल: फेसबूकच्या (Facebook) माध्यमातून पोलिसांनी (police) एक केस सोडवल्याची माहिती समोर आली आहे. आजकाल जवळजवळ प्रत्येकजण सोशल मीडिया साइटवर खूप Active असतं. याचाच फायदा घेत उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) पोलिसांनी एका मोठ्या प्रकरणाची उकल केली आहे. प्रयागराजमधून एका तरुणावर एका तरुणीचे अपहरण केल्याचा आरोप होता. तरुणीला घेऊन आरोपी मुंबईला पळून गेला असं समोर आलं होतं. मात्र आरोपीचा मोबाईल बंद असल्यानं लोकेशन ट्रेस करणं कठीण होत होतं. मात्र पोलिसांनी एका तरुणीचा फेसबुक आयडी तयार करून आरोपी तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर फेसबुक आयडीवरून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच अपहरण झालेली तरुणीही परत भेटली आहे.
शहरातील यमुनापार परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने घूरपूर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुरजीत नावाच्या तरुणाचा शोध सुरू केला, त्यानंतर आरोपी मुंबईत राहत असल्याचं समजलं. मात्र पोलिसांकडे आरोपीचा मोबाईल हा एकच त्याचा शोध घेण्याचा मार्ग होता. मात्र त्याचा मोबाईल बंद होता.
आरोपी अडकला फेसबुकच्या जाळ्यात
दरम्यान पोलिसांना एका गोष्टीची माहिती मिळाली की, आरोपी तरुण फेसबुकवर खूप सक्रिय असतो. हे पाहता ट्रेनी आयपीएस चिराग जैन याने बनावट तरुणीचा फेसबुक आयडी तयार करून आरोपी तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तरुणाने ती फ्रेंड रिक्वेस्ट Accept केली आणि येथून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. फेसबुकवरील संभाषणात तरुणाकडून फोन नंबर मागण्यात आला. आरोपीने फेसबुक चॅटवर त्याचा नंबर देताच, त्या नंबरच्या आधारे त्याला ट्रेस करून अटक करण्यात आली. एवढंच नाही तर प्रयागराज घूरपूर येथील रहिवासी असलेल्या अपहरण झालेल्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
अपहरण मुलीला मेडिकलसाठी पाठवले
प्रयागराज पोलिसांचे ट्रेनी आयपीएस चिराग जैन यांनी बुधवारी आरोपी तरुण आणि अपहरण झालेल्या मुलीला मुंबईहून प्रयागराजला आणलं. आता पोलीस आरोपी तरुणाची कसून चौकशी करत असून, पोलिसांनी तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. प्रयागराजच्या या ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्याची पोलीस विभागात चर्चा होत आहे, कारण फेसबुक आयडी बनवून आरोपीला अटक करण्याचे हे पहिलंच प्रकरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, IPS Officer, Kidnapping, Up Police, Uttar pradesh news