मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'हे बाळ माझंच'! रुग्णालयात एकाच बाळासाठी 2 महिलांचा दावा; अखेर 56 दिवसांनंतर झाला उलगडा

'हे बाळ माझंच'! रुग्णालयात एकाच बाळासाठी 2 महिलांचा दावा; अखेर 56 दिवसांनंतर झाला उलगडा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

खंडपीठाने आपल्या निकालात असेही निर्देश दिले की नवजात सुमारे 56 दिवस त्याच्या आईच्या प्रेमापासून दूर राहिले. यामुळे नवजात बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीची सीएमएस महिला रुग्णालयाकडून तपासणी करण्यात यावी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 25 सप्टेंबर : रुग्णालयात बाळाच्या जन्मानंतर पालक मोठ्या आनंदात आपल्या बाळाला घरी घेऊन जातात. मात्र, उत्तर प्रदेशातून एक अजब प्रकरण समोर आलं. यात चक्क रुग्णालयातच बाळांची आदलाबदली झाली. अखेर 56 दिवसांनंतर यूपीच्या बाराबंकी येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये झालेल्या दोन नवजात बालकांच्या कथित अदलाबदलीबाबत केलेल्या डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांना मिळाला. पोलिसांनी न्यायालयाच्या बाल कल्याण समितीसमोर अहवाल सादर केला.

जैदपूर परिसरातील नीलम या महिलेशी बाळाचा डीएनए रिपोर्ट जुळल्यानंतर बाळ तिच्या ताब्यात देण्यात आलं. समितीचे अध्यक्ष न्यायदंडाधिकारी बाला चतुर्वेदी, सदस्य रचना श्रीवास्तव, राजेश शुक्ला आणि दीपशिखा यांनी शुक्रवारी डीएनए अहवाल आणि रुग्णालयातील नोंदी तपासल्यानंतर नवजात मुलाला त्याचे खरे वडील विक्रम आणि आई नीलम यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले. विक्रम आणि त्याची पत्नी जैदपूरमधील जियानपूरचे रहिवासी आहेत.

जीवापाड प्रेमात झाली मनोरूग्ण, 17 महिन्यांपर्यंत मृतदेहाची सेवा; दररोज नमस्कार करून ड्यूटीवर जात होती बँक मॅनेजर पत्नी

पोलीस अधिकार्‍यांनीही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आणि या प्रकरणातील डीएनए अहवाल लवकरात लवकर देण्याचे आवाहन केले. आदेशाची प्रत मिळताच नवजात बालकाच्या कुटुंबीयांचे चेहरे आनंदाने उजळले. सीडब्ल्यूसी खंडपीठाने आपल्या निकालात असेही निर्देश दिले की नवजात सुमारे 56 दिवस त्याच्या आईच्या प्रेमापासून दूर राहिले. यामुळे नवजात बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थितीची सीएमएस महिला रुग्णालयाकडून तपासणी करण्यात यावी.

हे प्रकरण 27 जुलैचं होतं. फतेहपूरच्या बानी रोशनपूर येथील सत्येंद्र वर्मा यांची पत्नी हर्षिता हिने एका मुलाला जन्म दिला. काही अडचणींमुळे आशा वर्कर गीता यांनी मुलाला एनआयसीयूमध्ये दाखल केलं. दरम्यान, रात्री 11 वाजता जैदपूरच्या विक्रमने आपल्या काही तासांच्या नवजात बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल केलं. जिथे आधी एका मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्हीकडील लोक जिवंत असणाऱ्या मुलावर आपला हक्क सांगत होते. ज्यावर पालक आणि मुलाची डीएनए चाचणी करण्यात आली.

मुंबई : दहावीच्या मुलीचा मृतदेह टेरेसच्या भिंतीला लटकलेल्या स्थितीत आढळला, परिसरात खळबळ

सीएमएस महिला रुग्णालयाचे डॉ. प्रदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षिताच्या पहिल्या दोन मुलांचा गर्भातच मृत्यू झाला होता. पहिली गर्भधारणा फतेहपूरमध्ये झाली. तिसर्‍या मुलाच्या मृत्यूनंतर हे जोडपं नैराश्यात गेलं. डीएनए चाचणीच्या अहवालाची विचारपूस करण्यासाठी हे दाम्पत्य अनेकदा रुग्णालयात जात होतं. दावेदार विक्रम आणि त्याची पत्नी नीलम यांनाही डीएनए चाचणीच्या निकालाची उत्सुकता होती. अखेर डीएनए चाचणीनंतर त्यांना त्यांचं बाळ परत मिळालं.

First published:

Tags: Mother, Small baby