जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मुंबई : दहावीच्या मुलीचा मृतदेह टेरेसच्या भिंतीला लटकलेल्या स्थितीत आढळला, परिसरात खळबळ

मुंबई : दहावीच्या मुलीचा मृतदेह टेरेसच्या भिंतीला लटकलेल्या स्थितीत आढळला, परिसरात खळबळ

मुंबई : दहावीच्या मुलीचा मृतदेह टेरेसच्या भिंतीला लटकलेल्या स्थितीत आढळला, परिसरात खळबळ

ही घटना मुंबईतील लोअर परेल भागातील सचुरी म्हाडा कॉलनीत घडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमित राय, प्रतिनिधी मुंबई, 24 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हत्या, आत्महत्येच्याही घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील लोअर परेल भागातील आज एका 15 वर्षीय मुलीचा मृतदेह इमारतीच्या टेरेसच्या भिंतीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना मुंबईतील लोअर परेल भागातील सचुरी म्हाडा कॉलनीत घडली. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मुलीची ओळख पटली आहे. ती मुलगी देखील त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होती. तसेच ती दहावीची विद्यार्थिनी होती, अशी माहिती समोर आली आहे. इमारतीत मुलीचा मृतदेह लटकलेला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या मुलीकडून कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडलेली नाही. ही आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार -  दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील बोरिवली एमएचबी पोलिसांकडून गुरुवारी दुपारी एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या आल्या असून त्याची अंदाजे किंमत 2000 रुपये इतकी आहे. हेही वाचा -  महिलांनो सावधान, लोकलमध्ये फिरतोय अर्धनग्न नराधम, जोगेश्वरीत तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार ड्रग विकणारी महिलेला अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारानंतर बोरिवली आणि दहिसर पश्चिमच्या परिसरामध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिलेची एमएचबी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात