लखनऊ 19 जुलै: एक अत्यंत हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत एका 25 वर्षीय महिलेनं आपल्या दोन मुलांची हत्या (Mother Killed Her 2 Kids) केली आहे. इतकंच नाही तर यानंतर या महिलेनं स्वतःही गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं वय 5 वर्ष तर मुलाचं दीड वर्ष होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधील (Ghazaibad) आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री ‘या’ कामासाठी बॉयफ्रेंडला बोलवलं घरी; सकाळी समोर आला धक्कादायक प्रकार लोनी बॉर्डर परिसरातील उत्तरांचल कॉलनीत राहाणाऱ्या 25 वर्षीय प्रिया दहियानं 18 जुलै रोजी सायंकाळी आपल्या पाच वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर तिनं आपल्या 1 वर्ष 6 महिन्याच्या मुलाचीही गळा दाबून हत्या केली. आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेतल्यानंतर प्रियानं स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखळ झाले आणि तिघांनाही दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी या तिघांनाही मृत घोषित केलं. मुलगी झाल्यानं नणंदेनं वहिनीला जिवंत जाळलं; धक्कादायक कारण आलं समोर महिलेनं उचललेल्या या धक्कादायक पावलामुळे सगळेच हैराण झाले आहेत. घरात पती-पत्नी आणि मुलांशिवाय दुसरं कोणीच राहात नव्हतं. अशात प्रियानं आपल्या दोन मुलांचा जीव घेत स्वतःही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.