मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

डोअर बेल वाजवली, दार उघडताच नमस्कार करण्यासाठी वाकला खाली; काही सेकंदात खेळ खल्लास!

डोअर बेल वाजवली, दार उघडताच नमस्कार करण्यासाठी वाकला खाली; काही सेकंदात खेळ खल्लास!

गोळ्यांच्या आवाजाने घरातील सदस्यही बाहेर आले. पाहतात तर...

गोळ्यांच्या आवाजाने घरातील सदस्यही बाहेर आले. पाहतात तर...

गोळ्यांच्या आवाजाने घरातील सदस्यही बाहेर आले. पाहतात तर...

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 23 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) कानपुरमधून बुधवारी रात्री आयआयटीचे निवृत्त डिप्टी रजिस्ट्रार राजाराम वर्मा यांना (75) गोळी घालून हत्या (Murder) करण्यात आली. वर्मा निवृत्तीनंतर वकिली करीत होते आणि कोट्यवधी संपत्तीचे मालक होते. दुचाकीस्वारांनी आधी घराची बेल वाजवली. वर्मा यांनी स्वत: गेट उघडलं. हल्लेखोरांनी त्यांना बाबुजी म्हणत नमस्कार करण्यासाठी खाली वाकले आणि अचानक त्यांच्यावर गोळ्या घालून फरार झाले. सांगितलं जात आहे की, वर्मा यांना रात्री एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितलं होतं की, त्यांना काही कागदपत्रं द्यावयाची आहे. पोलीस वर्मा यांचे कॉल डिटेल्स घेऊन तपास करीत आहे. (rang the door bell opened the gate and fired Death of retired Deputy Registrar from IIT)

गोळीबार आणि आरडाओरडा ऐकून घरातील सदस्य बाहेर आले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पळून निघून गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस कमिश्नर असीम अरूण यांनी सांगितलं की, मृत व्यक्तीचा मुलगा नरेंद्र देव यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा-रात्री एकत्र झोपले होते काका-पुतण्या, सकाळी खोलीत आढळले मृताव्यस्थेत

राजाराम यांचा मुलगा नरेंद्र देव यांनी सांगितलं की, त्यांनी 17 बिघा जमिन हस्तगत करण्यात आली आहे. 20 वर्षांपासून हे प्रकरणात कोर्टात आहे. या प्रकरणात बुधवारी कोर्टात तारीख होती आणि त्यांचा पक्षही मजबूत होता. कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, या वादातून त्यांची हत्या करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Murder