जयपूर, 21 एप्रिल : राजस्थानातील (Rajasthan News) उदयपुर येथील पॉक्सो कोर्टाने गुरुवारी दिलेला निर्णय ऐकून अनेकांना धक्काच बसला. कोर्टाने आरोपीची सुटका करीत आरोप करणाऱ्या महिलेला दोषी मानत शिक्षा सुनावली. या प्रकरणात महिलेने खोटी केस दाखल केली होती आणि कोर्टात दिलेल्या जबाबातून माघार घेतली. महिलेला 3 महिन्यांचा कारावास आणि 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उदयपूरमधील अंबामाता भागात राहणारी 19 वर्षीय तरुणी पायल पुजारीला कोर्टाने खोटी माहिती देणे आणि आपल्या जबाबातून मागे हटल्यामुळे कलम 344 अंतर्गत दोषी घोषित केलं. कोर्टाने महिलेला एका महिन्यांची वेळ दिली आहे. जर तिने हायकोर्टात अपील केली नाही तर तिला तुरुंगात पाठवण्यात येईल. या प्रकरणात वकील चेतन पुरी गोस्वामी यांनी सांगितलं की, महिला सातत्याने आपल्या जबाबातून मागे हटत होती. पीडितेने न्यायालयात खोटी शपथ घेतली आणि दिलेल्या जबाबातून माघार घेतली. यामुळे कोर्टाने पीडितेला कलम 344 अंतर्गत दोषी मानत शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात पीडितेने पोलिसांना आरोप केला. गोस्वामी पुढे म्हणाले की, अशा केसेसमुळे कोर्ट आणि पोलिसांचा वेळ, पैसे वाया जाता. हे ही वाचा- बायको-गर्लफ्रेंड्सच्या डिमांड पूर्ण करता करता दमछाक, अखेर त्याने गँग बनवली आणि…; CCTV मुळे समोर आलं कांड काय आहे संपूर्ण प्रकरण… गेल्या वर्षी मे महिन्यात पीडिता पायलने नवीन कुमार नावाच्या व्यक्तीवर बलात्काराता आरोप लावला होता. पीडितेने सांगितलं की, नवीनने तिला कोल्डड्रिंक्समध्ये नशेचं औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. इतकच नाही तर त्याचा व्हिडीओ करीत व्हायरल करण्याची धमकी दिली. याशिवाय तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती केली. पीडितेने सुरुवातील पोलीस आणि त्यानंतर कोर्टात कलम 164 अंतर्गत दिलेल्या जबाबात हा सर्व प्रकार कथन केला. महिलेच्या जबाबाच्या आधारावर नवीन कुमारला अटक करण्यात आली आणि त्याला सहा महिने तुरुंगात शिक्षा भोगावी लागली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.