जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बायको-गर्लफ्रेंड्सच्या डिमांड पूर्ण करता करता दमछाक, अखेर त्याने गँग बनवली आणि...; CCTV मुळे समोर आलं कांड

बायको-गर्लफ्रेंड्सच्या डिमांड पूर्ण करता करता दमछाक, अखेर त्याने गँग बनवली आणि...; CCTV मुळे समोर आलं कांड

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बायको-गर्लफ्रेंडसाठी त्याने असं पाऊल उचललं ज्याचा 800 सीसीटीव्ही तपासातून खुलासा झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 एप्रिल : बायको असो वा गर्लफ्रेंड त्यांना इम्प्रेस करण्यासाठी म्हणा, त्यांच्या चेहऱ्यावर हसू-आनंद आणण्यासाठी म्हणा किंवा त्यांची डिमांड-इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणा. बहुतेक नवरे-बॉयफ्रेंड त्यासाठी प्रयत्न करतात. काही जण तर नको तो मार्गही निवडतात. अशाच एका व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पत्नी आणि गर्लफ्रेंड्स यांची डिमांड पूर्ण करण्यासाठी या व्यक्तीने गँग बनवली आणि त्यानंतर त्याने जे कांड केलं त्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून उलगडा झाला आहे (Gang to fullfill wife’s and girlfriend’s demand). दिल्लीतील 25 वर्षांचा तरुण. आकाश असं त्याचं नाव आहे. त्याचं लग्न झालं आहे. पण बायकोसोबत त्याच्या गर्लफ्रेंड्सही आहेत. आता बायको आणि गर्लफ्रेंड्स यांच्या डिमांड पूर्ण करता करता त्याची दमछाक झाली. अखेर त्याने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक गँगच तयार केली.  या गँगमध्ये शेख एहसान अली (24), बदरेआलम (23), राजेश (24) और मोहम्मद जियाउद्दीन (52) या तरुणांचा समावेश आहे. आता ही गँग करायची काय? तर चोरी. मोठ्यामोठ्या चोऱ्या ही गँग करत होती. 31 मार्चला या टोळीने आरके पुरममधील एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरात चोरी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय कुंडु यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आलं. दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे वाचा -  Alert! तुम्हालाही WhatsApp वर KBC Lucky Draw चा मेसेज आलाय? रिप्लाय देण्याची घाई नको आधी हे वाचा लल्लूराम डॉट कॉम च्या रिपोर्टनुसार साऊथ वेस्ट जिल्ह्यातील डीसीपी मनोज सी यांनी सांगितलं की या प्रकरणाच्या खुलासा करण्यासाठी आम्ही जवळपास 800 सीसीटीव्ही फुटेज तपासले. या गँगमधील चौघांनी आरके पुरममध्ये एका घरातून दागिने चोरल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यापैकी एक जण आमच्या ताब्यात सापडला. त्यानंतर आम्ही इतर चौघांनीही बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून 49 हातातील घड्याळं, रोख रक्कम आणि 21 लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे दागिने आणि प्रॉपर्टीची कागदपत्रं जप्त केली आहेत. हे वाचा -  ‘26 एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून घेऊन जा’; 10 रुपयांच्या नोटेवर BF साठी GF चा मेसेज VIRAL हे सर्वजण दिल्लीच्या बवानामध्ये राहणारे आहेत. त्यांच्यावर 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.  या गँगचा प्रमुख आकाशने आपली पत्नी आणि काही गर्लफ्रेंडच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ही गँग बनवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात