भरतपुर, 1 डिसेंबर : राजस्थान (Rajasthan news) मधील भरतपुर जिल्ह्यातून भावनिक वृत्त ( emotional story) समोर आलं आहे. येथे एका दीड वर्षांच्या मुलीचं पाण्याच्या टाकीत खेळता खेळता मृत्यू (death) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक (Shocking News) बाब म्हणून जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा घरात कोणत्याही सदस्याला कळालं देखील नाही. जोपर्यंत कुटुंबीयांना चिमुरडीबद्दल कळालं तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
खेळता खेळता चिमुरडीचा झाला मृत्यू
ही दु:खद घटना मंगळवारी सायंकाळी भरपूरमध्ये बयानामध्ये सायंकाळी उशिरा घडली. जेव्हा दीड वर्षांची एक चिमुकडी विक्रांशी आपली मोठी बहीण हिमांशी (5) सोबत खेळता खेळता घराच्या अंगणात आली. येथे एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. चिमुरडी खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडली. मुलीच्या मृत्यूचं कळाल्यानंतर घरात आरडाओरड सुरू झाला. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्य शेतात काम करीत होते.
हे ही वाचा-शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या; हल्लेखोरांनी गळा चिरून पळवलं मुंडकं
तेव्हा महिला घरातील कामात व्यस्त होत्या. काही वेळानंतर जेव्हा घरातील महिलांचं मुलीकडे लक्ष गेलं तर त्यांना 3 वर्षांची हिमांशी अंगणात एकटीच खेळताना दिसली. मात्र छोटी विक्रांशी दिसत नव्हती. जेव्हा महिलांनी विक्रांशीला इकडे तिकडे पाहिलं तर ती पाण्यात टाकीत पडली होती. तिला पाहून महिला घाबरल्या. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेल. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.