Home /News /crime /

शहरात दहशत असणाऱ्या 'लेडी डॉन'च्या प्रेमात 2 गँगस्टर झाले 'जानी दुश्मन'

शहरात दहशत असणाऱ्या 'लेडी डॉन'च्या प्रेमात 2 गँगस्टर झाले 'जानी दुश्मन'

19 वर्षीय रेखा मीना हिला डिस्को आणि दारू पार्टीची आवड आहे.

    जयपूर, 22 जानेवारी : राजस्थानच्या (Rajasthan News) क्राइम वर्ल्डमध्ये (Crime World) कुख्यात 'लेडी डॉन' (Lady Don) हिला शेवटी पोलिसांनी अटक केली आहे. करोलीची 19 वर्षीय रेखा मीना हिला डिस्को आणि दारू पार्टीची आवड आहे. आणि गँगवाॅरमधील रेखा फेसबुकवर लाइव्हमध्ये (Facebook Live) सर्वांसमोर धमकी देत होती. सिगारेटचे झुरके घेत रेखा इतक्या घाणेरड्या शिव्या देते, की ऐकणाऱ्याचे कान फाटतील. पोलिसांनी अटक केलेल्या रेखाचा भूतकाळ तपासून पाहिला तर धक्कादायक गोष्टी समोर आल्या. दोन गुंड मित्रांमध्ये पडली फूट.. करोलीचे कुडगाव हिस्ट्रीशीटर आणि बीजलपूर येथील राहणारा पप्पू मीणा आणि 2 हजार रुपयांचं बक्षीस ठेवलेला गुंड अनुराज मीणा चांगले मित्र होते. दोघांचा एकमेकांवर जीव होता. मात्र अचानक दोघांमधील दुरावा वाढला. हे अंतर इतकं वाढलं की दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले. जयपूरमध्ये राहत असताना रेखा मीणा गुंड अनुराज मीणाच्या संपर्कात आली होती. अनुराजसोबत रेखाचे संबंध वाढले. साधारण सहा महिन्यांपूर्वीच अनुराजने रेखाला आपला मित्र पप्पू सोबत भेट घडवून आणली होती. यादरम्यान रेखाचे संबंध पप्पू मीणासोबतही वाढले होते. हे ही वाचा-पुणे: TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचा शिकार, 31वर्षीय नराधम गजाआड रिलेशनदरम्यान रेखाची एक पोस्ट हिस्ट्रीशीटर पप्पूने सोशल मीडियावर शेअर केली होती. याबाबत अनुरागला कळताच त्याचा पारा चढला. रेखाने फेसबुकवर पप्पूच्या विरोधात शिव्या देत एक पोस्ट शेअर केली. अनुराज आणि रेखाची लाइव्ह फेसबुक पोस्ट पाहून पप्पूला धक्काच बसला. रेखाला शिव्या देत पोस्ट शेअर केली. अनुराज आणि रेखाचा लाइव फेसबुक पोस्ट पाहून पप्पू संतापला. रेखाला आपल्या टीममध्ये घेण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघेही आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rajasthan

    पुढील बातम्या