Home /News /pune /

पुणे: TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचा शिकार, 31 वर्षीय नराधम जेरबंद

पुणे: TVचा आवाज वाढवून अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचा शिकार, 31 वर्षीय नराधम जेरबंद

Rape on Minor Girl in Pune: पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) परिसरातील म्हाळुंगे याठिकाणी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 22 जानेवारी: पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) परिसरातील म्हाळुंगे याठिकाणी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor girl rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित मुलीला भाजी बनवण्यासाठी घरी बोलावून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. नराधमाने पीडित मुलीचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून टीव्हीचा आवाज वाढवून चिमुकलीवर बलात्कार (rise tv volume and raped minor girl) केला आहे. पीडित मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर आई वडिलांना हा प्रकार सांगितला आहे. या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. योगेश साहेबराव चाटी असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याची पत्नी कामावर गेली होती. यावेळी आरोपीनं घरी भाजी बनवायची असल्याचं सांगून पीडितेला आपल्या घरी बोलावलं होतं. हेही वाचा-मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला पहारा, हिंगोलीतील घटना यावेळी पीडितेला एकटं पाहून आरोपीनं तिच्यासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्याने पीडित मुलीचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून घरातील  टीव्हीचा आवाज वाढवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी गरीब घरातील आहे. संबंधित घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. हेही वाचा-पुण्यात विधवा महिलेवर 8 जणांकडून बलात्कार, नराधमांनी केलेलं कृत्य वाचून हादराल अत्याचार झाल्यानंतर भेदरलेल्या पीडित मुलीनं घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. ओळखीच्याच व्यक्तीनं अशाप्रकारचं कृत्य केल्यानं आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन मुलीवर बलत्कार झाल्याची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape on minor

    पुढील बातम्या