मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Rajsthan Crime News : एका कॉल रेकॉर्डिंगचे 7 बळी, एकाच चितेवर जणांना मुखाग्नी, पत्नीच्या कृत्यामुळे कुटुंब संपवलं

Rajsthan Crime News : एका कॉल रेकॉर्डिंगचे 7 बळी, एकाच चितेवर जणांना मुखाग्नी, पत्नीच्या कृत्यामुळे कुटुंब संपवलं

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचोर या गावात एकाच कुटूंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पती पत्नीसह 5 मुलांना घेत नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन संपवल्याची घटना घडली आहे.

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचोर या गावात एकाच कुटूंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पती पत्नीसह 5 मुलांना घेत नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन संपवल्याची घटना घडली आहे.

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचोर या गावात एकाच कुटूंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पती पत्नीसह 5 मुलांना घेत नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन संपवल्याची घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jaipur, India

जयपूर, 03 मार्च : देशात दिवसेंदिवस खून, मारामारी, प्रेमप्रकरणातून हत्या अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात घडली आहे. जालोर जिल्ह्यातील सांचोर या गावात एकाच कुटूंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पती पत्नीसह 5 मुलांना घेत नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन संपवल्याची घटना घडली आहे.

दरम्यान या घटनेत सातही जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने सगळीकडे खळबळ उडाली होती. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसही काही काळ गोंधळल्याचे बोलले जात आहे. आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणार्‍या व्यक्तीने एवढे भयंकर पाऊल का उचललं याबाबत सर्वानीच सवाल उपस्थित केला आहे.

6 महिने केली चॅटिंग, समोर भेटल्यावर तरुणीसोबत घडलं भयंकर

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी शोध घेण्यास सुरू केले आहे. या भीषण घटनेमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. ही खळबळजनक घटना मागच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 1 मार्च 2023 रोजी घडली. याच दिवशी शंकर राम उर्फ ​​शंकरा कोळी यांचे पत्नी बादली हिच्याशी काही कारणावरून भांडण झाले. दरम्यान या पती पत्नींना तीन मुली आणि दोन मुलं अशी 5 अपत्य होती.

पती शंकर आपल्या पत्नीसह मुलांना घेऊन देवदर्शनासाठी सिद्धेश्वरला गेला होता. यावेळी त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. यावेळी शंकरने तिथेच कुटुंबासह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतल्याची माहिती समोर आली. दरम्यान ही घटना पोलिसांसह जिल्हाधिकारी, एसपी पथकाला माहिती देण्यात आली. यावेळी घटनास्थळी सर्वजण पोहोचत कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान कालव्यात वाहत गेलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आहे. याप्रकरणी मृत शंकरच्या भावाने शेजारीच राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरची पत्नी बादली शेजारीच राहणाऱ्या एका तरुणासोबत मोबाईलवर बोलत असल्याचा संशय शंकरला आला होता. यामुळे त्याने एक दिवस चोरून तिच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग अॅक्टिव्ह मोडवर केले. यानंतर जेव्हा शंकरने संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकले तेव्हा संपूर्ण सत्य समोर आले.

यासंदर्भात शंकरने पत्नीलाही समजावून सांगितले होते. एवढेच नाही, तर हे प्रकरण वाढल्यानंतर सामाजिक पातळीवरही तिला समजावून सांगण्यात आले. यानंतरही शंकरच्या पत्नीने संबंधित तरुणाशी बोलणे सुरूच होते. यासंदर्भात एकदा पंचायतही झाली, यात संबंधित तरूण भविष्यात असे करणार नाही, असे ठरले. मात्र या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग झाला नाही.

अजब प्रकरण! 2 विवाहित महिलांचं एकमेकींच्या पतीवर जडलं प्रेम; शेवटी घेतला असा निर्णय की सगळेच शॉक

पंचायत आणि सामाजिक पातळीवर समजावल्यानंतरही महिलेच्या प्रियकराने शंकरला फोन करून धमकी दिल्याचा आरोपही आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आरोपी तरुण शंकरला म्हणाला, पंचायत करून काय मिळवले. यानंतर शंकरच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. शंकरने 1 मार्च रोजी पत्नी आणि मुलांसह नर्मदेच्या कालव्यात उडी घेतली. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पत्नीच्या व्यभिचारामुळे हसते खेळते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Murder, Murder news, Rajstan