पुणे (मावळ), 14 फेब्रुवारी : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शिवली गावात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शिवली गावात राहणाऱ्या कदम कुटुंबियाचा पूर्वीपासूनचा येण्याजाण्याचा रस्ता खोदल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान यामध्ये काही गावगुंडानी कदम कुटुंबियांना मारहाण केल्याची वडगांव मावळ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. यावरून मारहाण झाली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीचा राग मनात ठेवून गावातील कदम कुटुंबाला गावगुंडांनी फावडे, दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शिवली येथे घडली. यासंदर्भात सविता सुरेश कदम यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! प्रियकर भाऊ असल्याचं भासवत पतीला दिलं विष, वाचा कसा झाला खुलासा
या तक्रारीनुसार आरोपी नितेश अनंता आडकर, रामभाऊ नारायण आडकर, देविदास बबन आडकर, तानाजी रामभाऊ आडकर, संगीता अनंता आडकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सविता कदम, विशाल कदम, रमेश कदम हे तिघे मारहाणीत जखमी झाले. या मारहाणीचा व्हिडीओ एका ग्रामस्थाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.
हे ही वाचा : हे काय कारण आणि वय होतं का? चप्पल घेऊन दिली नाही म्हणून 10 वर्षांच्या नातवाने संपवलं आयुष्य
पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्या
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृष्य वस्तू सापडली आहे. टनु गावात एका शेतकऱ्याला ही वस्तू सापडली आहे. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वस्तू ताब्यात घेतली आहे. बॉम्बनाशक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.