नवी दिल्ली, 30 जानेवारी : घरोघरी नवरा बायकोची भांडणं ही पहायला मिळतात. अनेकजणांची मजेशीर भांडणं असतात तर काहींची जीवघेणी. नवरा बायकोच्या भांडणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये अनेक नवरा बायकोंची टोकाची भांडणे होतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला असून बायकोने नवऱ्याची जीभ चावली आहे. बायकोने नवऱ्याची जीभ चावल्याचा प्रकार हरियाणातील हिसारमधील बरवाला भागातील धानी गावात घडला आहे. या गावात राहणाऱ्या करमचंद नावाच्या तरुणाची त्याच्याच पत्नीने जीभ चावली असल्याची घटना समोर आली. यावरच ती थांबली नाही तर तिने त्याच्या डोक्यातही काठीने वार केले. तरुणाच्या घरच्यांनाही शिवीगाळ केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - 14 कोटी महिन्याचा खर्च; तरुण दिसण्यासाठी काय काय करतेय ही व्यक्ती? शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रडण्याचा आवाज आला. त्यानंतर घरातील सर्व धावत करमचंदच्या रुमकडे गेले. त्यांनी पाहिलं त्याच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्त येत आहे. त्यानंतर त्याला त्याचे वडिल मायाचंद यांनी रुग्णालयात दाखल केलं. करमचंदच्या जीभेला 15 टाके टाकल्यामुळे त्याला बोलताही येत नव्हतं. त्याने एका कागदावर लिहित त्याच्या बायकोमे जीभ चावल्याचं सांगितलं.
दरम्यान, पोलिसांना दिलेल्या जबाबात मायाचंद यांनी सांगितलं की, 10 वर्षापूर्वी मुलगा करमचंदचा विवाह झाला. फतेहाबाद जिल्ह्यतील इंदाछुई या गावातील सरस्वतीशी त्याचा विवाह झाला. त्यांनी मुलाचं लग्न करताना सांगितलं होतं की, मुलगा खाजगी नोकरी करतो. गेल्या काही दिवसांपासून सरस्वतीचे घरात भांडण होत होतं. ती सर्वांना शिवीगाळ करते आणि जीवे मारण्याची धमकी देते. सध्या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.